Aghori Ritual Crime | विवाहाचे आमिष दाखवत स्मशानात अघोरी पूजा; दोघे अटकेत

महाराष्ट्र अंनिसच्या प्रयत्नांना यश; प्रियकरासह दोघे जेरबंद
Aghori Ritual Crime
Aghori Ritual Crime
Published on
Updated on

नाशिक : विवाह जमवून देण्याचे आमिष दाखवत महिलेकडून ७७ हजार रुपये उकळत मध्यरात्री स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याप्रकरणी पंचवटीतील विशाल रामदास खडांगळे या कथित भोंदूसह साथीदाराला भद्रकाली पोलिसांनी अटक केली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पीडितेला धीर देत पोलिस ठाण्यात नेल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.

गुजरातमधील बलसाड येथील या जितू महिलेची नाशिकमधील अण्णाराव पवार याच्याशी चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध निर्माण झाले. जितूने विवाहाचे आश्वासन दिले. मात्र, काही वर्षांनी त्याने विवाहास नकार दिला. याबाबत जाब विचारल्यावर त्याने महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. जितू हा फुलेनगरच्या विशाल खडांगळे याच्यासोबत भगतगिरी करत होता.

महिलेने भोंदू खडांगळेकडे तक्रार केल्यानंतर त्याने तिला नाशिकला बोलावून जितू व्यवस्थित वागत दोघांचा विवाह होईल, असे आश्वासन दिले. त्यानंतर भद्रकालीतील अमरधाम स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा केली. या पूजेसाठी खडांगळेने ऑनलाइन पद्धतीने तिच्याकडून ७७हजार रुपये घेतले. मात्र, विवाह न झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पैसे परत मागितले. त्यावेळी भोंदूसह प्रियकराने तिला दमदाटी व मारहाण केल्याचा आरोप आहे. महिलेने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.

समितीच्या पुढाकाराने भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली. पोलिसांनी संबंधितांविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यासह अन्य तरतुदींनुसार गुन्हा दाखल करत दोघांना अटक केली. कारवाईसाठी अंनिसचे डॉ. टी. आर. गोराणे, कृष्णा चांदगुडे, प्रल्हाद मिस्त्री, प्रा. आशा लांडगे, महेंद्र दातरंगे, रंजन लोंढे यांनी प्रयत्न केले. याबाबत उपनिरीक्षक सिराजउद्दीन शेख तपास करत आहे.

Aghori Ritual Crime
Grape Farmers Fraud Case| बिहारच्या कावड यात्रेतून आरोपी जेरबंद, द्राक्ष उत्पादकांची ७९ लाखांची फसवणूक

८७ पैकी १२ नाशिकमध्ये भोंदूगिरीचे गुन्हे

गेल्या पाच महिन्यांत महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत ८७ गुन्हे दाखल झाले. नाशिकमधील हा १२ वा गुन्हा ठरला.

Aghori Ritual Crime
Digital Preservation of Rare Manuscripts | दुर्मीळ हस्तलिखितांना मिळणार 'डिजिटल' संरक्षण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news