Maharashtra Politics | सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील

Maharashtra Politics | आमचा एकमताने निर्णय; माजी मंत्री कोकाटेंनी ठणकावून सांगितले !
Wari 2025
पांडुरंग सर्वांच्या मनोकामना ऐकतील, अन् भविष्यात दादाही मुख्यमंत्री होतील: सुनेत्रा पवारFile Photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

बारामतीत विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. त्यानंतर पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे, असा दावा केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी केलेली असताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या आमच्या पक्षाच्या नेत्या आहेत. त्या निर्णय घेतील.

Wari 2025
Mayem Mining Protest | मागण्या मान्य केल्याशिवाय खाण व्यवसाय नको

फक्त सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. बाकी कोणी होणार नाही. सह्या करो किंवा न करो, आमची चर्चा झाली आहे. उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच असतील आणि सगळ्या महत्त्वाच्या पदावर वहिणीच असतील, असे माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ठणकावून सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मंत्री कोकाटे यांनी याबाबत भूमिका मांडली. कोकाटे म्हणाले की, आम्ही संपूर्ण अस्थीकलश मुंबईत आणले. प्रत्येक जिल्ह्यात हे अस्थीकलश नेण्यात येणार आहे. नंतर विधिवत त्याचे पूजन करण्यात येईल. काही ठिकाणी शोकसभादेखील घेत आहोत. ३६ च्या ३६ जिल्ह्यांत हे कलश नेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.

Wari 2025
Goa Budget Reaction | अर्थसंकल्प गोव्याच्या विकासाला नवी दिशा देणारा; काजू-नारळ क्षेत्रासाठी आशेचा किरण – दामू नाईक

कोकाटे पुढे म्हणाले की, मला एक समजत नाही की, विलीनीकरणाबाबत का चर्चा करत आहेत. हा प्रश्न कौटुंबिक आहे. त्यात काय चर्चा झाली, याबाबत आम्हाला माहीत नाही. आम्हाला माहिती मिळत नाही, तोपर्यंत आम्ही काही बोलणार नाही. जी चर्चा आहे ती वहिनींसोबत अजितदादांनी केली असणार. आम्हाला काही माहीत नाही.

सगळे वहिनींसोबत चर्चा करतील आणि त्या जो निर्णय घेतील, तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल, असेदेखील कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केले. सुनेत्रा पवार या पक्षाच्या नेत्या आहेत, त्या पक्षाबाबत निर्णय घेतील. केवळ सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होणार आहेत. उत्तराधिकारी त्या असल्याने सगळ्या महत्त्वाच्या पदावर त्या असतील, असे माणिकराव कोकाटे यांनी यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news