Nashik News : पूर्व भागात सेक्युलर फ्रंट, 'एमआयएम'चा सामना

मालेगावात सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये घराणेशाहीचा वरचष्मा
Municipal Election
इंदिरानगर : प्रभाग ३९ मध्ये राखीव अ गटातून निवडणूक लढवत असलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सुनील कोथमिरे यांच्या प्रचारफेरीला झालेली गर्दी.pudhari photo
Published on
Updated on

मालेगाव : महापालिका निवडणूक प्रचार टिपेला पोहोचला आहे. ८४ जागांसाठी ३०१ उमेदवार रिंगणात आहेत. पश्चिम भागात भाजप-शिवसेना, तर पूर्व भागात मालेगाव सेक्युलर फ्रंट विरुद्ध एमआयएम, तर पश्चिम भागात भाजप विरुद्ध शिवसेना आमने-सामने लढत दिसून येत आहे. शहरातील ८४ जागांवर एकाही पक्षास उमेदवार उभे करता आलेले नाही.

सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी घराणेशाहीचा कित्ता गिरविला. मंत्री दादा भुसे वगळता सर्व प्रमुख राजकीय नेतेही कुटुंबातील उमेदवारांना उमेदवारी देण्यात व घराणेशाहीची परंपरा चालविण्यात अग्रेसर राहिले. त्याचा काय परिणाम होणार याची उत्सुकता आहे.

Municipal Election
Jalna Civic Issues : शहर अडचणीत, नेते सत्ता स्पर्धेत मग्न

पूर्व भागात इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली पार्टी ऑफ महाराष्ट्र (इस्लाम), समाजवादी पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांनी मालेगाव सेक्युलर फ्रंट तयार करून निवडणुकीस सामोरे जात आहे. एमआयएम व काँग्रेस युती होण्याचे संकेत होते. परंतु कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी युती करण्यास नकार दिल्याने दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहे. पूर्वेला इस्लाम व एमआयएम यांनी एकमेकांवर टीकेचा भर दिला आहे.

इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेंब्ली इस्लाम

प्रभाग २- करनसेन भरत चव्हाण, सलमाबानो शफिक अहमद, हमीदाबानो शेख जब्बार, शर्जिल अन्सारी अकील. प्रभाग ३-खलिदाबानो निसार अहमद, सगीरुद्दीन नजीरूद्दीन, शेख जावीद शेख अनीस. प्रभाग ४- गुलशन जहाँ बाकीर हुसैन खान, शेख जलील शेख शफी, उद्धव उमाकांत दरेकर, प्रभाग ५- शेख नईम, यास्मिन फारूक खान, यास्मिन अल्ताफ बेग, मोहंमद आमीन मोहम्मद फारूक. प्रभाग ६- इरफान अली आबीद अली, शगुफ्ता शकील बेग, मुनीरा शेख फकीर मोहम्मद (बिनविरोध), नजीर अहमद इर्शाद अहमद, प्रभाग ८- निहाल अहमद उस्मान गणी, फरजाना शेख आरिफ, सुगराबी नबी शाह, सलीम अहमद अन्वर अहमद, प्रभाग १३ -फातमा हारून अहमद, प्रभाग १४ - इरफान मोहंमद इसहाक प्रभाग १५- खैरुन्निसा मोहम्मद रफिक, मोहंमद खालिद अब्दुल रशीद, जमशीद इफ्तेखार अहमद. प्रभाग १६ - मोहंमद शकील मोहम्मद शब्बीर, ताहेरा शेख रशीद, तबस्सूमबानो शेख सुलतान, इमरान अहमद सलीम अहमद. प्रभाग १७- मोहम्मद असलम खलील अहमद, शाहीनबानो मन्नान बेग, परवीनबानो रियाज अहमद, मोहंमद खालिद अब्दुल रशीद, प्रभाग १८- अनिस अहमद इक्बाल अहमद, मोहंमद आरिफ मोहंमद शरीफ, प्रभाग २०- महमुदाबानो अब्दुल कादीर, शेख नसरिनबानो मोहंमद खालिद, शेख रफीक शेख अफझल, आमीन खान शब्बीर खान. प्रभाग २१ - शकिला शेख मुसा, काशिफा मोहम्मद सादिक, शेख अब्दुल्लाह शेख रहीम, मुशरफ खान हारूण खान.

Municipal Election
Land Surveyor Bribery Case : नकाशा मोजणीसाठी 35 हजारांची लाच, भूकरमापक ‌‘एसीबी‌’च्या जाळ्यात

'एमआयएम'चे उमेदवार

प्रभाग २ आनंदराव भीमराव वाघ, मलिक सेठ, फारुख शाह, खालीद अहमद इम्तियाज अख्तर, प्रभाग ३ शमीमबानो मुहम्मद शकील, मोहसीनखान मुबारकखान, शहीना फरोग शेख, शाहीद अहमद रफीक अहमद, प्रभाग ४ - प्रतिभा रवींद्र बच्छाव, लुकमान अनिस कमाल, विशाल बाबूराव आहिरे, आमना खातून अब्दुल अजीज. प्रभाग ५ - परवीनबानो शेख जाकीर, वकील खान अजीज खान, जफर अहमद अहमदुल्लाह, जकीयाबानो अबरार अहमद. प्रभाग ६ - शेख शफीक शेख हबीब, सलीम खान युसुफ खान, अब्दुल अजीज नजीर अहमद, समीना अन्वारूल हक. प्रभाग ७ - अब्दुल मजीद मोहंमद याकूब (चमडेवाले), राबिया मोहंमद हुसेन, तन्वीर जुल्फेकार अहमद, हीना मोहंमद फारूक कुरैशी. प्रभाग १३ अन्सारी आसेफा मोहंमद राशीद, हाफीज अब्दुल्ला मुफ्ती मोहंमद इस्माईल, शेख कलीम शेख दिलावर, रिजवानाबी शेख सलीम, प्रभाग १४ मोहंमद उमर जलील अहमद (जल्ला दादा), रिजवाना तहेसीन सोहेल मास्टर, सलमान अनीस कमाल, आलीया अखलाख अहेमद अन्सारी. प्रभाग १५ फिरदौसजहाँ मोहंमद अयाज, मोहंमद आरीफ मोहंमद बशीर सिलोटी, साजदाबानो रईस अहमद, साजिद अख्तर शकील अहमद, प्रभाग १६ - शेख युसूफ शेख चांद, इफ्तिखार अहमद तजम्मुल हुसेन, यास्मिनबानो शेख रफिक, तहेसीना कौसर नाजीम अख्तर.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news