Malegaon Mayor Election | महापौरपदासाठी चार उमेदवारी अर्ज विक्री

Malegaon Mayor Election | शिवसेनेची भूमिका अद्यापही गुलदस्त्यात
Malegaon Mayor Election
Malegaon Mayor Election
Published on
Updated on

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा

येथील महापौर व उपमहापौर पदासाठी दि. ७फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक होणार आहे. निवडणुकीत इस्लाम पक्ष व समाजवादी पार्टी सेक्युलर फ्रंटच्या ४० जागा आहेत. फ्रंटने काँग्रेसला सोबत घेत ४३ हा बहुमताचा आकडा गाठला आहे. महापौरपदासाठी इस्लाम पक्षाच्या नसरीनबानो खालीद अहमद यांनी चार, तर उपमहापौर पदासाठी समाजवादी पार्टीच्या शानेहिंद निहाल अहमद यांनी दोन अर्ज निवडणूक विभागाकडून घेतले आहेत.

Malegaon Mayor Election
Nashik Road Repair | निकृष्ट रस्ते दुरुस्ती; आयुक्तांची धडक कारवाई

तर महापौरपदी नरसिनबानो, उपमहापौरपदी शानेहिंद यांची निवड होण्याची शक्यता आहे. निवडणूक सहा दिवसांवर येऊन ठेपली असताना, एमआयएम व शिवसेनेने अद्याप भूमिका जाहीर केली नसल्याने वेगवेगळे तर्कवितर्क सुरू आहे. महापौरपद सर्वसाधारण गट महिला आरक्षित आहे.

महापौर व उपमहापौर निवडीची तारीख जाहीर झाल्याने येथे राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. सेक्युलर फ्रंटकडे काठावरचे बहुमत आहे. काँग्रेसचे तीन व भारतीय जनता पक्षाचे दोन नगरसेवकांनी भारतीय विकास आघाडीची स्थापना केली आहे. या संदर्भात पाच सदस्यांच्या गटाची नोंदणी करण्यात आली आहे. काँग्रेसने सेक्युलर फ्रंटला पाठिंबा दिला आहे, तर महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा, यासंदर्भात पक्षादेशानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल असे भाजपचे नगरसेवक मदन गायकवाड, प्रवीण उर्फ पमूदादा बच्छाव यांनी सांगितले.

फ्रंटला भाजप पाठिंबा देईल की नाही? की ही आघाडी फक्त स्वीकृत व स्थायी समितीवर संधी मिळावी या हेतूने झाली, हे लवकरच स्पष्ट होईल. स्थानिक पातळीवर परस्परविरोधी भाजप व काँग्रेस एकत्र आले असून, त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. येथील महापौरपदाची निवडणूक दि. ७ फेब्रुवारी रोजी होईल. आगामी दोन दिवसांत विरोधी पक्षातर्फे कोणी या पदांसाठी अर्ज घेणार काय याची उत्सुकता आहे.

दोन दिवसांत सर्व चित्र स्पष्ट होईल. सेक्युलर फ्रंट, काँग्रेसच्या पाठिंब्यावर सत्तेवर आल्यास स्थायी समितीचे सभापतिपद काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. महापौर व उपमहापौर निवणुकीसंदर्भात शिवसेनेची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असल्याचे सांगितले जाते. शिवसेनेने महापौरपदाची गणिते जुळतात का याची चाचपणीही केली जात होती. सेक्युलर फ्रंटने महापौर व उपमहापौर पदासाठी अर्ज घेतल्याने शिवसेनेची सत्तेत सहभागी होण्याची शक्यता धुसर मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनाही फ्रंटला पाठिंबा देणार की, विरोधात बसणार हे लवकरच स्पष्ट होईल.

Malegaon Mayor Election
Maharashtra Politics | सुनेत्रा पवारच राष्ट्रीय अध्यक्ष होतील

एमआयएमचे अन्सारी कार्ड

एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मो. इस्माईल यांच्यासह पक्षाने महापौर निवडणुकीसाठी अद्याप आपली स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. तत्पूर्वी पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी 'इस्लाम'ला पाठिंबा देण्याचे सुचविले आहे. तथापि, इस्लाम पार्टी व सेक्युलर फ्रंटने अन्सारी महापौर करावा, अशी गुगली आमदारांनी टाकत शहरातील लुप्त होत चाललेल्या दखनी अन्सारी वादाला पुन्हा फोडणी दिली आहे. महापौरपदासाठी इस्लाम म्हणजेच फ्रंटच्या नसरीन बानो खालीद शेख या उमेदवार असून, त्या दखनी आहेत.

तथापि, हे शहर बुनकरांचे आहे. बुनकरांच्या समस्या याच बिरादरीला समजतात, असे मानून अन्सारी उमेदवाराचे नाव द्यावे, अशी गुगली टाकत हात झटकण्याचे काम आमदारांनी केल्याने येथे चर्चेला उधाण आले आहे. तथापि, आमदार मौलाना मुफ्ती यांनी निवडणूक प्रचार सुरु असताना महापौरपदासाठी मलिक युनूस ईसा यांच्या नावाची घोषणा केली होती. तेदेखील दखनीच होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news