Gutkha seizure Malegaon | मालेगाव : नशाही नशा हैं, २१ लाखांचा गुटखा जप्त

पोलिसांची मोठी कारवाई; चालकावर गुन्हा दाखल
Gutkha seizure Malegaon
मालेगाव तालुका पोलिसांनी जप्त केलेल्या गुटख्यासह पोलिस पथक.pudhari photo
Published on
Updated on

मालेगाव : तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर सायने शिवारात पोलिसांनी प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. यात सुमारे २१ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुटखा, जर्दा आणि तंबाखूचा साठा तसेच पाच लाख रुपांचा ट्रक असा एकूण २६ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई सोमवारी (दि. १९) पहाटेच्या सुमारास करण्यात आली.

पोलिसांनी संशयावरून ट्रक (एमपी १३, झेडडब्ल्यू १७०५) अडवून तपासणी केली. त्यात राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू‌चा मोठा साठा आवळून कंपन्यांचा ४० गोण्या गुटखा, ८ गोण्या पानमसाला तसेच मोठ्या प्रमाणावर सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली. याप्रकरणी ट्रकचालक शोकीनखों इदेखौँ याच्याविरुद्ध अन्न व औषध प्रशासन कायदा तसेच भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Gutkha seizure Malegaon
Minor girl molestation case : धोंडवीरनगरच्या खासगी शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग

दरम्यान, अवैध गुटखा वाहतुकीमागील मुख्य सूत्रधार कोण, हा साठा कुठून आला आणि कुठे वितरण होणार होता, याचा तपास सुरू आहे. राज्यात गुटखाबंदी असतानाही अशा प्रकारे सर्रास वाहतूक सुरू असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे मालेगावात गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा गुटखा साठा जप्त केला असूनही अवैध व्यापार थांबत नसल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे

Gutkha seizure Malegaon
Nashik mayor reservation : महापौरपदावर अनुसूचित जातीचे आरक्षण शक्य

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news