Nashik Crime News: मालेगाव डोंगराळे येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशी; न्यायालयाचा मोठा निर्णय

Dongrale Rape and Murder Case: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चार वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे
Nashik Dongrale Rape and Murder Case
Nashik Dongrale Rape and Murder CasePudhari
Published on: 
Updated on: 

Dongrale Rape and Murder Case: नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे चार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने आरोपी विजय खैरनार याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. आज मालेगाव न्यायालयाने हा महत्त्वाचा निकाल दिला. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता.

चॉकलेटचे आमिष दाखवून चिमुकलीचे अपहरण

ही घटना १७ नोव्हेंबर २०२५ रोजी घडली होती. डोंगराळे गावातील अवघ्या चार वर्षांच्या मुलीला आरोपी विजय खैरनार याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने मुलीचे अपहरण केले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यानंतर स्वतःचा गुन्हा उघड होऊ नये, या उद्देशाने तिच्या डोक्यावर दगडाने वार करून तिची हत्या केली.

यानंतर आरोपीने मुलीचा मृतदेह मोबाईल टॉवरजवळील निर्जन ठिकाणी टाकून दिला. मुलगी बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. ती गंभीर जखमी अवस्थेत आढळली. मात्र, रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त करण्यात आला होता.

Nashik Dongrale Rape and Murder Case
Sanjay Raut Supreme Court Apology: ‘एकदा नाही, मी दहादा माफी मागतो’; संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाची माफी का मागितली?

पोलिसांकडून आरोपीला अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाला वेग दिला. तपासादरम्यान विजय खैरनार याला अटक करण्यात आली. या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी पुढील तपास पूर्ण केला.

Nashik Dongrale Rape and Murder Case
CJP Abhijeet Dipke: ज्या गोष्टीची भीती होती तेच घडलं...; सीजेपीला स्वकीयांचाच सर्वात मोठा धक्का; नेमकं काय घडलं?

उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन शासनाने ज्येष्ठ विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडण्यासाठी नियुक्ती केली होती. खटल्यादरम्यान सरकारी पक्षाने एकूण २४ साक्षीदारांची तपासणी केली. आरोपीविरोधातील पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब न्यायालयासमोर मांडण्यात आले.

१ ऑक्टोबर २०२६ रोजी मालेगाव येथील अपर जिल्हा व सत्र न्यायालयाने विजय खैरनार याला दोषी ठरवले होते. त्यानंतर आज १६ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news