Nashik Vani Robbery | एका लाखाच्या बदल्यात सहा लाखांचे आमिष; वणीत चाकूचा धाक दाखवून तरुणाला लुटले

३ लाख ८७ हजारांचा मुद्देमाल लंपास, तीन आरोपी अटकेत तर पाच जणांचा शोध सुरू
Thane Youth Looted
वणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली Pudhari
Published on: 
Updated on: 

Thane Youth Looted

वणी : एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून ठाणे जिल्ह्यातील तरुणाला वणी येथे बोलावून घेत निर्जनस्थळी चाकूचा धाक दाखवत मारहाण करून लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत तरुणाकडील रोख रकमेसह मोबाईल फोन, बँक कार्डे आणि अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आल्याची फिर्याद आहे. या प्रकरणी वणी पोलिसांनी तातडीने तपास करत तीन आरोपींना अटक केली असून, अन्य पाच साथीदारांचा शोध सुरू आहे.

जुन्या मित्राने दाखवले पैशांचे आमिष

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण (जि. ठाणे) येथील जेकब निक्लस फर्नांडिस (वय ३९) हे पेस्ट कंट्रोलचा व्यवसाय करतात. त्यांचा शाळेतील जुना मित्र विजय आहेर याने एका लाखाच्या बदल्यात सहा लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. या आमिषाला बळी पडून फर्नांडिस हे रोख रकमेसह वणी येथे आले.

Thane Youth Looted
Nashik Crime News | कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांड खटल्याला वेग! तपासी अंमलदाराची न्यायालयात महत्त्वाची साक्ष

९ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी तीन ते चार वाजेदरम्यान आरोपींनी त्यांना वणी-फोफशी रस्त्यावरील एका निर्जनस्थळी नेले. तेथे विजय आहेर, संदीप शिंदे, प्रदीप गावीत आणि त्यांच्या अन्य पाच साथीदारांनी संगनमताने फर्नांडिस यांना चाकूचा धाक दाखवून बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

नंबरप्लेट नसलेल्या तवेरा गाडीतही मारहाण

आरोपींनी फर्नांडिस यांना नंबरप्लेट नसलेल्या पांढऱ्या तवेरा गाडीत जबरदस्तीने बसवले. गाडीतही त्यांना मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तू लुटल्याची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

Thane Youth Looted
Nashik Crime | नाकाबंदी तोडून पळणाऱ्या इनोव्हाचा थरारक पाठलाग; गुटखातस्कराला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांचा दणका!

लुटलेल्या मुद्देमालामध्ये दोन लाख रुपयांची रोकड, एक लाख ५० हजार रुपये किमतीचा आयफोन १५ प्रो मॅक्स, ३५ हजार रुपये किमतीचा वनप्लस मोबाईल, विविध बँकांची आठ क्रेडिट कार्डे, चार डेबिट कार्डे आणि डेल कंपनीची लॅपटॉप बॅग यांचा समावेश आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत ३ लाख ८७ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

तीन आरोपी अटकेत; पाच साथीदारांचा शोध

या घटनेनंतर जेकब फर्नांडिस यांनी वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत विजय आहेर, संदीप शिंदे आणि प्रदीप गावीत या तिघांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेल्या अन्य पाच आरोपींचा शोध सुरू असून, त्यांच्या अटकेसाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.

सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत फड यांच्या मार्गदर्शनाखाली वणी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Thane Youth Looted
Nashik Crime : देवळा तालुक्यात अवैध गुटख्याविरोधात कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

आर्थिक आमिषातून जुन्या मित्रालाच लक्ष्य

अधिक पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून जुन्या मित्रालाच लुटल्याच्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news