School Inspection | राज्यातील शाळांमध्ये 2, 3 आणि 5 डिसेंबरला पटपडताळणी; विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासणार

School Inspection | शाळांमध्ये पुन्हा पटपडताळणी मोहीम! गैरहजर विद्यार्थ्यांची होणार प्रत्यक्ष तपासणी
School verification
राज्यातील सर्व शाळांतील पटपडताळणी एकाच वेळी होणार file photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष उपस्थिती आणि शाळांच्या पटसंख्येची पडताळणी करण्यासाठी शिक्षण संचालनालयाने पुन्हा विशेष मोहीम हाती घेतली आहे. येत्या २, ३ आणि ५ डिसेंबर २०२६ रोजी राज्यभरातील शाळांमध्ये पटपडताळणी करणार आहे. या मोहिमेत दुसरी ते आठवी, नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासली जाणार आहे.

School verification
Maharashtra Aapla Dawakhana Services आपला दवाखाना बंद करण्याचा निर्णय; ठाणे, नाशिक आणि नागपूरमधील सेवा २ नोव्हेंबरपासून बंद

यासाठी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांची विशेष पथके नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार, यापूर्वी ११, १५ आणि २२ एप्रिल २०२६ रोजी राज्यात पटपडताळणीचा उपक्रम राबविला होता.

या पडताळणीदरम्यान २५ ते ५० टक्के तसेच ५० टक्क्यांपेक्षा अधिक अनुपस्थिती असलेल्या शाळा आणि एप्रिल महिन्यात पटपडताळणी न झालेल्या शाळांची पुन्हा तपासणी करण्याबाबत शिक्षण संचालनालयाने निर्देश दिले होते. त्यानुसार आता डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील पडताळणी केली जाणार आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत आयोजित नियतकालिक मूल्यांकन चाचणी अर्थात पीएटी परीक्षेच्या वेळापत्रकानुसार दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती २, ३ आणि ५ डिसेंबर रोजी तपासली जाणार आहे.

School verification
Nashik Bomb Threat | नाशिक जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी; सहावा मजला उडवण्याचा ई-मेल

तसेच नववी आणि अकरावीच्या वर्गांचीही याच तीन दिवसांत पटपडताळणी होईल. मात्र, दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र पटपडताळणीची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. बोर्डाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती ग्राह्य धरली जाणार आहे.

शिक्षणाधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांचे पटपडताळणी नियोजन एकत्रित करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत.

ऑनलाइन प्रणालीवर नोंद बंधनकारक

पटपडताळणीसाठी मुख्याध्यापक लॉगिन, केंद्रप्रमुख लॉगिन, केंद्रप्रमुख ईओ लॉगिन, गटशिक्षणाधिकारी लॉगिन तसेच शिक्षण विभागाच्या संबंधित ऑनलाइन प्रणालीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून शाळांना भेट देणाऱ्या पथकांनी उपस्थित आणि गैरहजर विद्यार्थ्यांची नोंद करणे अपेक्षित आहे.

पथके शाळांना भेट देणार

पटपडताळणीसाठी केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक, माध्यमिक व योजना), लेखाधिकारी, शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (डायट) अधिव्याख्याते, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक तसेच विस्तार अधिकारी यांची पथके नियुक्त करण्यात येणार आहेत. ही पथके संबंधित शाळांना प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांची उपस्थिती तपासतील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.