

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली होती. या मुदतीनंतर म्हणजेच १ जुलैपासून एचएसआरपी न बसविणाऱ्या वाहनधारकांवर पोलिस व परिवहन विभागाकडून मोटार वाहन कायानुसार कडक कारवाई करण्यात नसलेल्या वाहनांसाठी आरटीओमधील अनेक महत्त्वाच्या सेवा बंद करण्यात येणार असल्याने वाहनधारकांनी मुदतीपूर्वीच नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट नसलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे अथवा उतरविणे, वाहनाची पुनर्नोदणी, वाहनातील बदल तसेच परवाना नूतनीकरण यांसारख्या आरटीओच्या सेवा उपलब्ध होणार नाहीत. मात्र, प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात एचएसआरपी बसविण्याच्या कामासाठी तीन झोन निश्चित करण्यात आले असून, झोननिहाय अधिकृत कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शासनाने यासाठीचे दरही निश्चित केले असून, दुचाकीसाठी ४५० रुपये, तीनचाकीसाठी ५०० रुपये, तर हलकी, मध्यम व अवजड मोटार वाहनांसाठी ७४५ रुपये (जीएसटी व फिटमेंट शुल्क वगळून) आकारण्यात केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ५० आणि मोटार वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार पोलिस व परिवहन विभाग संयुक्त अथवा स्वतंत्रपणे ही कारवाई करणार आहेत.
तसेच सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनीही त्यांच्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी एचएसआरपी नंबर प्लेट बसवून घेण्याचे आवाहन परिवहन विभागाचे सहआयुक्त शैलेश कामत यांनी केले होते.
एचएसआरपी नसल्यास या सेवा बंद वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा चढविणे / उतरविणे, वाहनाची पुनर्नोदणी, वाहनातील बदल नोंदणी, परवाना नूतनीकरण (फिटनेस प्रमाणपत्र नूतनीकरणाला सूट)