Nashik Tree Census 2026 | नाशिकच्या निसर्गसंपदेत वाढ! शहरातील वृक्षांची संख्या 50 लाखांच्या पार; मनपाची नवी गणना अंतिम टप्प्यात

Nashik Tree Census 2026 | आतापर्यंत ४८ लाख वृक्षगणना पूर्ण; महिनाभरात अहवाल येणार
tree counting
वृक्षगणना Pudhari File photo
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दहा वर्षांपूर्वी केलेल्या वृक्षगणनेत नाशिक महापालिका क्षेत्रात ४८ लाख वृक्ष आढळल्यानंतर अतिरिक्त मंजुरीवरून ही गणनाच बादात सापडली असताना महापालिकेच्या उद्यान विभागाने नव्याने केलेल्या वृक्षगणनेत शहरातील वृक्षांची संख्या ५० लाखांवर असल्याची माहिती समोर येत आहे. आतापर्यंत ४७ लाख वृक्षांची गणना पूर्ण झाली, अजूनही काही भागांतील वृक्षगणना होणे बाकी आहे.

tree counting
Forest Department Raid | इगतपुरीत भोंदूबाबाच्या घरावर वनविभागाची धाड! वन्यजीवांच्या अवयवांसह आरोपी अटकेत

महिनाभरात वृक्षगणनेचे काम पूर्ण करून उद्यान विभागामार्फत आयुक्तांना अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांनी दिली आहे. महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने २०१६ मध्ये वृक्षगणना केली होती. टेरेकॉन कंपनीला या वृक्षगणनेचे काम देण्यात आले होते.

शहरात २५ लाख वृक्ष आढळतील, असा अंदाज गृहीत धरून महापालिकेने या वृक्षगणनेला प्रशासकीय मंजुरी दिली होती. परंतु वृक्षगणेत ४८ लाख वृक्ष आढळल्याचा दावा करत संबंधित ठेकेदाराने महापालिकेकडे पावणेदोन कोटींच्या अतिरिक्त देयकाची मागणी केल्याने वाद निर्माण झाला होता.

tree counting
Chandwad ACB Raid | चांदवड प्रशासन लाचखोरीने पोखरले! महिनाभरात 3 मोठे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

महापालिकेची पूर्वपरवानगी न घेता २५ लाखांपुढील वृक्षगणना केली गेल्याने महापालिकेने संबंधित ठेकेदाराचे देयक नाकारले होते. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने न्यायालयात धाव घेतली. दरम्यान, दर सहा वर्षांनी महापालिका हद्दीतील वृक्षगणना करणे बंधनकारक असल्याचा दावा करत महापालिकेच्या उद्यान व वृक्षप्राधिकरण विभागाने शहरात पुन्हा वृक्षगणना करण्याचा निर्णय घेतला. यासाठी गतवर्षी निविदा प्रक्रिया राबवून मे. ऑरनेट टेक्नोलॉजी या कंपनीला वृक्षगणनेच्या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. या मक्तेदार कंपनीकडून शहरातील वृक्षगणनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. गणनेत आतापर्यंत ४७ लाख वृक्ष आढळून आले आहेत.

प्रत्येक वृक्ष जिओ टॅग

वृक्षगणनेंतर्गत मक्तेदार कंपनीच्या पथकामार्फत वृक्षाची प्रजाती, वय, खोडाची रुंदी, वृक्षाची उंची मोजली जात असून, प्रत्येक वृक्ष जिओ टॅगिंग केले जात आहे. वृक्षगणना आता अंतिम टप्प्यात आहे. या वृक्षगणनेवर १०.०८ कोटींचा खर्च केला जात आहे.

दर सहा वर्षांनी महापालिका क्षेत्रातील वृक्षगणना करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने नेमलेल्या मक्तेदार कंपनीमार्फत वृक्षगणनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. महिनाभरात वृक्षगणनेचे काम पूर्ण होईल.

-विवेक भदाणे, उद्यान अधीक्षक, मनपा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news