Maharashtra Honey Trap Scandal : 'हनी ट्रॅप'साठी खंडणीविरोधी पथके मैदानात

तपासाला गती : राज्यातील इतरही जिल्ह्यांत तक्रार अर्ज दाखल झाल्याची माहिती
Honey Trap Scandal:
Honey Trap Scandal: 'हनी ट्रॅप'चा मास्टरमाइंड नाशिकचाचPudhari News Network
Published on
Updated on

The scope of the 'honey trap' of senior officials, politicians, and former ministers is increasing.

नाशिक : बड्या अधिकारी, राजकारणी आणि आजी-माजी मंत्र्यांच्या 'हनी ट्रॅप'ची व्याप्ती वाढत चालली आहे. नाशिक, ठाण्यामध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर पुण्यातही गुन्हे अन्वेषण विभागाकडे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, त्यास पोलिसांनी अधिकृत दुजोरा दिला नाही. दरम्यान, हनी ट्रॅपच्या तपासासाठी विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे नाशिक, ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने तपासाला गती दिली असून, बरीच महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

नाशिक आणि ठाण्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये घडलेल्या या हनी ट्रॅपमध्ये तब्बल ७२ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह आजी-माजी मंत्र्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ असल्याचे समजते. यातील बहुतांश अधिकारी हे महसूल विभागाशी संबंधित असल्याचीही माहिती समोर येत आहे. दरम्यान, या प्रकरणातील महिलेच्या माध्यमातून हॉटेलमालकाने एका अधिकाऱ्याला मागितलेल्या दहा कोटींच्या खंडणीनंतर या संपूर्ण प्रकरणाला हवा मिळाली. या अधिकाऱ्याने महिला आणि हॉटेलमालकास ४० लाख रुपये देऊन प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. परंतु, हॉटेलमालकाकडून पैशांसाठी तगादा लावल्याने व महिलेने संबंधित अधिकाऱ्याची मुंबई नाका पोलिसात तक्रार दिल्याने, बिथरलेल्या अधिकाऱ्याने ठाणे पोलिसांत धाव घेतली होती. यामुळे हॉटेलमालक अडचणीत आल्याने, त्याने दोघांमध्ये समझोता घडवून आणत तक्रार अर्ज मागे घेण्यास लावले. मात्र, ही बाब संबंधित अधिकाऱ्याच्या पत्नीला कळाल्याने, तिने आपल्या पतीला गोवले जात असल्याची तक्रार देताना त्यात बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नामोल्लेख केला. त्यानंतर इतरही अधिकाऱ्यांनी ठाणे गुन्हे शाखेसह मुंब्रा, कळवा याठिकाणी खंडणीविरोधी पथकांकडे तक्रार अर्ज दाखल केले.

Honey Trap Scandal:
Maharashtra Honey Trap Scandal: 'हनी ट्रॅप'चा मास्टरमाइंड नाशिकचाच

दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती वाढतच असल्याने, नाशिक आणि ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने गोपनीय तपासाला गती दिली आहे. त्यानुसार या प्रकरणाशी संबंधित हॉटेलमालक आणि महिलेची ठाणे आणि नाशिकच्या पथकाकडून संयुक्तपणे तपास करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाशी निगडित बरीच माहिती पोलिसांनी हस्तगत केली असून, लवकरच त्याबाबतचा सविस्तर अहवाल राज्याच्या गृहविभागास सादर केला जाणार आहे.

Honey Trap Scandal:
Honey trap case : राज्यातील ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचे धागेदोरे सरकार तपासणार

संबंधित महिला नाशिकची

हनी ट्रॅप प्रकरणातील मुख्य संशयित असलेली महिला ही मूळची नाशिकची रहिवासी आहे. अलीकडच्या काही काळापासून ती ठाणे येथे स्थायिक झालेली आहे. पूर्वी सिडको व त्यानंतर पाथर्डी फाटा येथे मागील २० वर्षांपासून तिचे वास्तव्य आहे. हॉटेलमालकाशी हितसंबंध जोपासत कमी कालावधीत तिने मोठी आर्थिक प्रगती केल्याचीही माहिती समोर येत आहे. मुंबईतील सर्वात मोठ्या बिल्डरच्या गृहप्रकल्पामध्ये ती ठाणे येथे सध्या वास्तव्यास आहे. परिसरामध्ये तिचे स्वत:चे तीन कपड्यांचे शोरूमसुद्धा आहेत. पाथर्डी फाटा, मुंबई नाका व गंगापूर रोड या परिसरातील संबंधित हॉटेलमालकाच्या लेट नाइट व इव्हेंट्समध्ये ती कायम दिसून येत असे.

ब्लॅकमेल करून लाटल्या जमिनी

महसूल विभागातील बरेच अधिकारी या ट्रॅपमध्ये अडकले आहेत. या अधिकाऱ्यांकडून जमिनींवरील आरक्षणे हटविणे, आदिवासींच्या जमिनी लाटणे, कायदेशीरदृष्ट्या अडचणीचे जमिनींचे व्यवहार करणे, गुन्हेगारी कृत्यांत सहभागी असणाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊ नये, अशी व्यवस्था करणे, काही विशिष्ट लोकांना अडचणीत टाकणे आदी बेकायदेशीर कृत्यही या अधिकाऱ्यांकडून करून घेतल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यासाठी अधिकाऱ्यांना 'ब्लॅकमेल' करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news