Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; सकारने SIT नेमली, फार्महाऊसवर शस्त्र सापडलं, तपासात धक्कादायक खुलासा

Ashok Kharat Nashik Case: नाशिकमध्ये अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने SIT नेमली आहे. फार्महाऊसवर छापा टाकताना पोलिसांना पिस्तूल आणि महत्त्वाची कागदपत्रे सापडली. या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Ashok Kharat Nashik Case SIT Probe
Ashok Kharat Nashik Case SIT ProbePudhari
Published on
Updated on

Ashok Kharat Nashik Case SIT Probe: नाशिकमध्ये एका धक्कादायक प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळख निर्माण केलेल्या आणि राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या अशोक खरातला लैंगिक अत्याचाराच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. महिलांना विश्वासात घेऊन त्यांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून या प्रकरणाची राज्य सरकारनेही गंभीर दखल घेतली आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमलं आहे. वरिष्ठ अधिकारी तेजस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे. SIT स्थापन झाल्यानंतर या प्रकरणात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वीही नाशिक पोलिसांनी खरातच्या घराची झडती घेतली होती.

दरम्यान, गुन्हे शाखेने खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्महाऊसवर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली असून त्याची मालमत्ता आणि व्यवहारांशी संबंधित माहिती तपासात समोर येत आहे. याच ठिकाणाहून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य आणखी वाढलं आहे.

Ashok Kharat Nashik Case SIT Probe
Ashok Kharat News | लैंगिक छळ प्रकरणी कॅप्टन खरातला क्राईम ब्रांचच्या बेड्या

अशोक खरात हा मुळात मर्चंट नेव्हीत काम केलेला निवृत्त अधिकारी आहे. निवृत्तीनंतर त्याने अंकशास्त्र आणि ज्योतिषाच्या माध्यमातून स्वतःची ओळख तयार केली. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा तो अध्यक्ष आहे. अनेक वर्षांपासून तो लोकांना भविष्य सांगणे आणि विविध समस्यांवर उपाय सुचवण्याचा दावा करत होता. यामुळे अनेक राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि व्यावसायिक त्याच्या संपर्कात होते.

मात्र, त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनुसार, एका 35 वर्षीय महिलेला त्याने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे. या तक्रारीनंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आणि बुधवारी पहाटेच्या सुमारास गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेतलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news