Crop Damage | 'एनडीआरएफ'च्या निधीची वाट न पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत! कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा

Crop Damage | अल निनोच्या भीषण संकटामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे.
Crop Damage
Crop Damage
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल निनोच्या भीषण संकटामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला असतानाच आता या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही चांगलेच तापू लागले आहे. केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या 'एनडीआरएफ'च्या निधीची अजिबात वाट न बघता, राज्य सरकार 'पीक कापणी प्रयोगा'च्या आधारे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना थेट आणि भरीव मदत देण्याच्या तयारीत असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली.

Crop Damage
Nashik Ganesh Visarjan | नाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरपर्यंत कलम 163 लागू; विसर्जन मिरवणुकीत लेझर लाइट्सवर पूर्णपणे बंदी!

मदतीसंदर्भातील पहिला महत्त्वाचा शासन निर्णय (जीआर) लवकरच जाहीर केला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नाशिक विभागाच्या पीक आढावा बैठकीनंतर गुरुवारी (दि. २४) आयोजित पत्रकार परिषदेत मंत्री भरणे यांनी ही भूमिका स्पष्ट केली.

मंत्री भरणे यांनी सांगितले की, नागपूर आणि पुणे वगळता सर्वच विभागांमध्ये सर्व मंत्री स्वतः बांधावर जाऊन पिकांची पाहणी करत आहेत. "जागेवर पीक हिरवे दिसत असले तरी त्यात दाणेच नाहीत, अशी अत्यंत विदारक स्थिती आहे.

'ज्याचे जळते, त्यालाच कळते' अशी स्थिती आज शेतकऱ्यांची आहे," असे सांगत मंत्र्यांनी भावनिक साद घातली. शासकीय लालफितीचा कारभार आणि जाचक अटींचा फटका शेतकऱ्यांना बसू नये म्हणून सरकारने महत्त्वाचा धोरणात्मक बदल केला आहे.

एरवी ऑक्टोबर महिन्यात होणारा 'पीक कापणी प्रयोग' या वर्षी थेट सप्टेंबरमध्येच लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पावसातील खंड, पेरणीची आकडेवारी आणि धरणातील पाणीसाठा या पारंपरिक निकषांना बाजूला ठेवून थेट पीक कापणी प्रयोगाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जातील, असा विश्वास मंत्री भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

पत्रकार परिषदेस शिक्षणमंत्री दादा भुसे, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवाळ, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कृषी आयुक्त डॉ. सूरज मांढरे यांच्यासह प्रमुख नेते व अधिकारी उपस्थित होते.


संकटात राजकारण नको

निसर्गाच्या संकटात राजकारण न करता शेतकऱ्यांना धीर देण्याची गरज असल्याचे मंत्री भरणे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण शासन यंत्रणा शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, त्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळाचे सावट गडद होत असतानाच शासनाकडून लवकरच अधिसूचना काढली जाईल. दुष्काळावर विरोधकांनी कोणतेही राजकारण करू नये, याउलट शासनाला सूचना कराव्यात, असे मंत्री भरणे यांनी सांगितले.

पाण्याचे योग्य ते नियोजन

पावसाची स्थिती लक्षात घेता आगामी ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यावर शासनाचा भर आहे. उपलब्ध साठ्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर केला जाईल. पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.


दुष्काळाचा 'जीआर' आजच

कोरड्या दुष्काळासंबंधीचा 'जीआर' आज, शुक्रवारी काढला जाईल, असे स्पष्ट करून कर्जमाफीपासून २०१६-१७ मध्ये वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ दिला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी वाशीम दौऱ्यात केली. शेतकऱ्यांना भरीव मदतीचे आश्वासन देत, त्यासंबंधीचा 'जीआर' देखील आजच काढला जाणार आहे. शेतकऱ्यांना करण्यात येणारी ही मदत दिवाळीपूर्वी मिळेल, असे ते म्हणाले.

Crop Damage
Maternity Benefit Scheme | कुपोषणमुक्तीकडे मोठे पाऊल; लाभार्थी संख्येत नाशिक जिल्हा राज्यात 'नंबर वन'

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बुधवारी लातूर, धाराशिव, सोलापूरचा दौरा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाशीम, अकोला, अमरावतीमधील काही दुष्काळी गावांची पाहणी केली. कारंजा तालुक्यातील म्हसला येथे शेतकऱ्यांनी त्यांची गाडी अडवून कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली. तेव्हा फडणवीस यांनी गाडी थांबवून शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्या शेतकऱ्यांचे नाव कर्जमाफीच्या यादीत नाही, त्यांनाही योजनेचा लाभ मिळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विशेषतः, २०१६-१७ मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, त्यांना या घोषणेचा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले. शासन शेतकऱ्यांसोबत आहे. त्यांना जास्तीत जास्त मदत करण्यात येईल. यासंबंधीची अधिसूचनाही लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. आगामी काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आवश्यक नियोजन करण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news