

नाशिक : धनराज माळी
सद्यस्थितीत विविध आजारांनी डोके वर काढले आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने गोर-गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष महत्त्वाचा आधार ठरत आहे. या कक्षाच्या मदतीमुळे अनेक रुग्णांना जीवघेण्या आजारांपासून जीवनदान मिळत आहे. यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कार्यरत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे रुग्ण धाव घेऊ लागले आहेत.
वर्षभरात या कक्षांमार्फत राज्यभरातील ३५ हजार ३६२ रुग्णांना विविध आजारांवर उपचारासाठी २९९ कोटींहून अधिक अर्थसाहाय्य लाभल्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा आधार मिळाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। यांच्या संकल्पनेतून या निधी कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. या कक्षामार्फत गत वर्षभरात अनेक सुधारणा करण्यात आल्या. या सकारात्मक बदलांचा परिणाम आता दिसत आहे.
राज्यातील गरजू रुग्णांना ६ डिसेंबर २०२४ते ६ डिसेंबर २०२५ या कालावधीत ३५ हजार ३६२ रुग्णांना २९९ कोटी ४३ लाख ५२ हजार ४०० रुपये इतकी वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळे लहान मोठ्या आजारांसह हृदयविकार आणि कर्करोगासारख्या आजारांनी त्रस्त रुग्णांना जीवनदान मिळाले आहे.
हा कक्ष सर्वसामान्य, गोरगरिबांसाठी देवदूत ठरत आहे. भविष्यात अधिकाधिक रुग्णांना मदत करता यावी, यासाठी त्रिपक्षीय करार, आरोग्यविषयक सर्व शासकीय योजनांचे एकत्रीकरण आदी उपक्रमांमधून गरजू रुग्णांसाठी मदतीचे मार्ग अधिक सुलभ होणार आहेत. जिल्हा कक्षाची स्थापना मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून लाभ मिळविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना पूर्वी मुंबईत फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे वेळ, पैशाचा मोठा खर्च व्हायचा. ही अडचण कायमची दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हा कक्षाची स्थापना करण्यात आली.
त्रिपक्षीय करार लवकरच
गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना महागड्या वैद्यकीय उपचारांचा लाभ देता यावा, यासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या पुढाकारातून त्रिपक्षीय करार लवकरच करण्यात येणार आहे. यात मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्ष, कॉर्पोरेट कंपनी, रुग्णालय आणि काही प्रमाणांत
आरोग्य योजनांचे एकत्रीकरण
राज्यातील विविध आरोग्य योजनांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे. सर्व आरोग्यविषयक योजनांचा लाभ एकाच प्रणालीत मिळू शकणार आहे. पात्रता, कागदपत्रे आणि अर्जप्रक्रिया एकसंघ झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय कमी होईल. त्याबरोबरच निधी व रुग्णालयांमधील समन्वय वाढून मदत मिळण्याचा वेग वाढणार आहे. एकत्रित आरोग्य साहाय्य मॉडेलमुळे गरीब, गरजू नागरिकांना योग्य वेळी योग्य योजना मिळविणे अधिक सोपे होणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी कक्षात वर्षभरात केलेल्या सुधारणा प्रत्यक्ष रूणांपर्यंत पोहोचल्या. सोपी ऑनलाइन प्रक्रिया, जिल्हा कक्षांची स्थापना आणि नवीन उपक्रमांमुळे हजारो रुग्णांना मदत मिळत आहे. आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरत आहे
रामेश्वर नाईक,कक्षप्रमुख, मुख्यमंत्री साहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुंबई