Lasalgaon Niphad Leopard Terror | निफाड तालुक्यात बिबट्यांचा वाढला वावर

Lasalgaon Niphad Leopard Terror | गोंदेगावसह पंचक्रोशीत भीतीचे वातावरण
Lasalgaon Niphad Leopard Terror
Lasalgaon Niphad Leopard Terror Pudhari File Photo
Published on
Updated on

लासलगाव : पुढारी वृत्तसेवा

निफाड तालुक्याच्या पूर्व भागात सध्या रानडुकरांच्या झुंडी मोठ्या प्रमाणावर फिरत असून, त्यामागोमाग बिबट्यांचाही वावर वाढल्याचे समोर आले आहे. वाहेगाव, गोंदेगाव, भरवस फाटा आणि गोळेगाव परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे.

Lasalgaon Niphad Leopard Terror
Goa Quepem Leopard Attack | केपे-कोळंबीत बिबट्याचा वावर

भीतीचे वाहेगाव परिसरातील वाबळे वस्तीवर एका बिबट्या मादीसह तिचे बछडे चव्हाण यांच्या शेतात वावरत असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तर गोंदेगाव येथे हरिभाऊ सांगळे यांच्या द्राक्षबागेत बिबट्याचा वावर आढळून आला आहे.

याशिवाय भरवस फाटा येथील जे. के. प्राइड परिसरात तसेच गोळेगावच्या डोंगरेवस्तीवरही बिबट्याच्या हालचाली दिसून आल्याने परिसरातील ग्रामस्थ अधिक सतर्क झाले आहेत. एकाच वेळी विविध ठिकाणी बिबट्यांचे दर्शन होत असल्याने या परिसरात बिबट्यांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Lasalgaon Niphad Leopard Terror
Leopard Attack | बिबट्याचा हैदोस! रामपूर आणि गुढे फाटा परिसरात बिबट्याची दहशत; वयोवृद्धाला 15 मिनिटे घरातच कोंडले

वनविभागाने काही ठिकाणी पिंजरे लावले असले, तरी अद्याप एकाही बिबट्याला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. नागरिकांनी विशेषतः रात्रीच्या वेळी एकटे बाहेर पडणे टाळावे, शेतात काम करताना दक्षता घ्यावी आणि वस्ती परिसरात बिबट्याचा किंवा इतर वन्यप्राण्यांचा संशयास्पद वावर आढळल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वाढत्या बिबट्यांच्या हालचालींमुळे वनविभागाने गस्त वाढवून तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news