Leopard Attack | बिबट्याचा हैदोस! रामपूर आणि गुढे फाटा परिसरात बिबट्याची दहशत; वयोवृद्धाला 15 मिनिटे घरातच कोंडले

Leopard Attack | नागरी वस्तीत बिनदिक्कत वावर; पाळीव जनावरांवर हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
Leopard Terror
शहापुरात बिबट्याची दहशत कायम; हल्ल्यात गाईचा मृत्यूFile Photo
Published on
Updated on

रामपूर : पुढारी वृत्तसेवा

रामपूर, गुढे फाटा, बौद्धवाडी, चव्हाणवाडी याठिकाणी बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून दहशत निर्माण झाली आहे. चार दिवसांपूर्वी गुढे फाटा येथे रात्री ८ वा. बिबट्याने मांजर पकडले असेच वयोवृद्ध अण्णा जाधव यांना बिबट्याने पंधरा मिनिटे घरात जाऊन दिले नाही. यावेळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता.

Leopard Terror
Crime News | मालवण-वायरी येथे तरुण व्यावसायिकाची आत्महत्या

बौद्धवाडी, चव्हाणवाडी, कात्रोळी येथे बिबट्या गुरांवर हल्ला करत आहे. कात्रोळी सात्विक टेप येथे बिबट्या असतो. सुहास जाधव यांच्या काजूवाडी येथे आंब्याखाली बिबट्या बसलेला होता. तालुक्यातील बोरगाव परिसरात वावर बिबट्याचा वाढता नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत असून दोन दिवसात बिबट्याने गावातील पाळीव श्वानांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत.

विशेष म्हणजे बंदिस्त शेडमध्ये शिरून बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या संपूर्ण घटनेचे दृश्य परिसरातील सी.सी.टीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्यामध्ये बिबट्या अत्यंत बिनधास्तपणे शेडमध्ये प्रवेश करून कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे.

Leopard Terror
Nashik MLC Election 2026 | भाजपचे 'ते' नऊ नगरसेवक गोत्यात ?

हा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर बोरगाव परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून बोरगाव परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्यांचा वावर वाढल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अनेकांनी रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन झाल्याचा दावा केला असून त्यामुळे लहान मुले, वृद्ध नागरिक तसेच, पाळीव जनावरे यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. सलग दोन दिवस घडलेल्या घटनांमुळे ग्रामस्थांनी वनविभागाकडे धाव घेत तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरा लावावा, तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यानी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्याची माहिती मिळाली असून नागरिकांनी रात्रीच्या वेळी सावध राहावे, तसेच पाळीव प्राणी सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news