Leopard Attack : आडगाव शिवारात बिबट्याचा श्वानावर हल्ला; प्रामाणिक दोस्ताची चिमुकल्याने घेतलेली गळाभेट शेवटची ठरली

Nashik Leopard Attack : आडगाव शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होतेय, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
आडगाव शिवार, नाशिक
रविवार दि. (दि.24) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसाच्या घराची राखण करणारा प्रामाणिक राखणदारावरच बिबट्याने हल्ला केल्याने श्वान जागीच ठार झाला आहे. Pudhari News Network
Published on
Updated on
Summary

ठळक मुद्दे

  • पोलीसाच्या घराची राखण करणारा प्रामाणिक राखणदाराच बिबट्याचा बळी

  • आडगाव परिसरात बिबट्याचा वावर

  • श्वान उचलून नेल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

नाशिक : आडगाव परिसरात हा मळ्यांचा परिसर असून गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन परिसरातील नागरिका यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. रविवार दि. (दि.24) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीसाच्या घराची राखण करणारा प्रामाणिक राखणदारावरच बिबट्याने हल्ला केल्याने श्वान जागीच ठार झाला आहे.

आडगाव शिवार, नाशिक
Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात बाप-लेक गंभीर जखमी

पोलीस कर्मचारी दिपाली संदीप नवले यांच्या घराजवळच मेडिकल कॉलेज परिसरात बिबट्या वावर दिसत असल्याने रहिवाशांनी सांगितले. या बिबट्याने रविवार दि. (दि.24) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नवले या पोलीसाच्या घराबाहेर राखण करणाऱ्या श्वानावर हल्ला करत श्वानाला उचलून नेले. श्वान उचलून नेल्याची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यामुळे येथील सर्व मळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून वनविभागाने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी आडगावकर रहिवाशांकडून होत आहे.

रात्रीच्या सुमारास आडगाव पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी पेट्रोलिंगवर असताना त्यांनाही बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे मळे परिसरातील नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव्हान आडगाव पोलीस ठाण्याकडून करण्यात आले आहे. तर बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करुन पिंजरा लावण्याची मागणी जोर धरु लागली आहे.

हृदयद्रावक ! प्रामाणिक दोस्ताची चिमुकल्याने घेतलेली गळाभेट शेवटची

रविवार दि. (दि.24) रोजी नेहमीप्रमाणे या श्वानाने आपल्या छोट्या मालकासोबत मस्ती करत खेळ खेळला. छोटया चिमुकल्याची गळाभेट घेत न्याहारी झाल्यावर श्वान घराबाहेर आपल्या मालकाच्या घराची राखण करत असतानाच नकळत बिबटयाने त्याचावर हल्ला केला. त्यामुळे प्रामाणिक दोस्ताची चिमुकल्याने घेतलेली गळाभेट शेवटची ठरली आहे. घरातीलच सदस्य असलेल्या श्वानाचा बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news