Nashik Crime News | कापडणीस पिता-पुत्र दुहेरी हत्याकांड खटल्याला वेग! तपासी अंमलदाराची न्यायालयात महत्त्वाची साक्ष

Nashik Crime News | मृतदेह सापडलेल्या ठिकाणच्या तपासी अंमलदाराची न्यायालयात साक्ष; ८ ला डॉक्टरांची साक्ष
Death
DeathPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुक्त विद्यापीठाचे सेवानिवृत्त कुलसचिव नानासाहेब रावजी कापडणीस (७०) आणि त्यांचा मुलगा अमित कापडणीस (३५) यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या खटल्यातील साक्ष नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. बुधवारी (दि. ३०) न्यायालयात मृतदेह सापडलेल्या ठिकाणच्या तपासी अंमलदाराची साक्ष नोंदविण्यात आली.

Death
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

त्यामुळे या बहुचर्चित हत्याकांडाच्या न्यायालयीन प्रक्रियेला वेग आला आहे. पुढील सुनावणी ८ ऑक्टोबरला शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांची साक्ष नोंदवली जाणार आहे. कापडणीस पिता-पुत्र जानेवारी २०२२ मध्ये बेपत्ता झाल्यानंतर सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

तपासादरम्यान पोलिसांनी मोबाईल व्यवहार, बँक स्टेटमेंट तसेच अन्य पुराव्यांच्या आधारे त्यांचा शेजारी व परिचित राहुल गौतम जगताप याचा सहभाग समोर आणला. कापडणीस यांच्या १० कोटी रुपयांच्या संपत्तीवर, शेअर्स आणि बँक खात्यांवर डल्ला मारण्याच्या उद्देशाने हा प्रकार केल्याचा आरोप तपासात करण्यात आला होता.

Death
Sumit Pagare Crime Case | राजू शेखसह 3 संशयित आरोपींना कल्याणहून नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

नानासाहेब कापडणीस यांचा खून करून त्यांचा मृतदेह मोखाडा परिसरात, तर अमित कापडणीस यांचा खून करून मृतदेह राहूरी (अहिल्यानगर) परिसरात नेऊन नष्ट केल्याचा आरोप राहुल जगतापवर आहे. या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, मे २०२६ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राहुल जगताप याला जामीन मंजूर केला आहे. सरकार पक्षाकडून ॲड. सचिन गोरवाडकर न्यायालयीन कामकाज पाहत आहेत. आगामी साक्षीदारांच्या जबाबांमुळे या प्रकरणातील घटनाक्रम आणि तपासातील पुराव्यांवर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news