Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

Nashik Drought | जिल्हा प्रशासनाकडून अहवाल; त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरीचाही मागणीच्या आधारे विचार
Nashik Drought Scarcity
Nashik Drought ScarcityPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारने जाहीर केलेल्या २६५ दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीतून नाशिक जिल्ह्यातील पाच तालुके दुष्काळाच्या निकषांतून वगळले होते. मात्र यातील चांदवड आणि नाशिक तालुक्यांचा फेरविचार करून दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावशासाठी जिल्हा प्रशासनाने शासनाला अहवाल पाठविला आहे.

Nashik Drought Scarcity
Nashik Municipal Corporation | नाशिक मनपात प्रशासकीय फेरबदल! प्रदीप चौधरींना मुदतवाढ, तर नीलेश भदाणेंची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती

तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी आणि शेतकऱ्यांच्या मागणीआधारे त्र्यंबकेश्वर, निफाड आणि दिंडोरी या अन्य तीन तालुक्यांचाही दुष्काळग्रस्त भाग म्हणून विचार करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

नाशिक जिल्ह्यातील पर्जन्यमान, पिकांची स्थिती आणि दुष्काळाच्या निकषांआधारे शासनाने दहा तालुक्यांचा दुष्काळग्रस्त भागांच्या यादीत समावेश केला आहे. मात्र, चांदवड आणि नाशिक तालुक्यांमध्ये पावसाचे प्रमाण, पिकांची परिस्थिती आणि निर्माण झालेली पाणीटंचाई लक्षात घेता या तालुक्यांचा यादीत समावेशाची मागणी केली होती. त्याची दखल घेत जिल्हा प्रशासनाने शासनाला वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला आहे.

Nashik Drought Scarcity
Kalika Mata Yatra | नाशिक कालिकामाता नवरात्र उत्सव: रहाटपाळण्याच्या जागेचा लिलाव वादाच्या भोवऱ्यात!

दरम्यान, त्र्यंबकेश्वर, निफाड आणि दिंडोरी तालुक्यांमध्ये काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत पाऊस झाल्याने त्यांचा सध्या दुष्काळग्रस्त यादीत समावेश झालेला नाही. मात्र, स्थानिक पातळीवरील पावसाची स्थिती, पिकांवरील परिणाम आणि शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन या तालुक्यांचाही विचार करण्याची मागणी होत आहे.

विशेष म्हणजे, मुंबई येथे मंत्रालयात मंगळवारी (दि. २९) झालेल्या बैठकीत पावसाचे संकट असलेल्या कोणत्याही तालुक्याला वगळले जाणार नाही, याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे उर्वरित तीन तालुक्यांच्या समावेशाच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा कोट:"दुष्काळाच्या निकषांनुसार चांदवड आणि नाशिक तालुक्यांच्या परिस्थितीचा जिल्हा प्रशासनाने आढावा घेतला असून, त्याबाबत शासनाला अहवाल पाठविला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांच्या मागण्या तसेच प्रत्यक्ष परिस्थिती लक्षात घेऊन त्र्यंबकेश्वर, निफाड आणि दिंडोरी तालुक्यांचाही शासनस्तरावर विचार व्हावा, यासाठी आवश्यक शिफारस करण्यात येईल."

- आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news