Sumit Pagare Crime Case | राजू शेखसह 3 संशयित आरोपींना कल्याणहून नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Sumit Pagare Crime Case | राजू शेखसह जमील रंगरेज, आदिल शेखला अटक
Crime News
Crime News File Photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोसावीवाडी परिसरातील सुमित पगारे हत्याकांडांनंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील प्रमुख संशयित राजू शेख, जमील रंगरेज आणि आदिल शेख यांना नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट व गुंडाविरोधी पथकाच्या संयुक्त कारवाईत कल्याण येथून ताब्यात घेतले. पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कल्याण येथे जाऊन ही कारवाई केली.

Crime News
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

सुमित पगारेच्या हत्येनंतर या प्रकरणाला धमकीच्या कथित फोनमुळे आणखी गंभीर वळण मिळाले होते. राजू शेखने पगारे कुटुंबीयांना फोन करून धमकी दिल्याचा आरोप केला होता. मृत सुमितचा आतेभाऊ सागर उर्फ बंटी मोरेला फोन करून, 'माझ्या विरोधात मोर्चा काढला, तर सर्वांना जिवे ठार मारू', तसेच '१५ मिनिटांत मर्डर करू', अशा स्वरूपाची धमकी दिल्याचा दावा तक्रारीत केला होता. या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिपही पोलिसांकडे सादर केली होती.

Crime News
Nashik Drought | चांदवड अन् नाशिक तालुका दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट होणार? जिल्हा प्रशासनाचा शासनाला अहवाल!

धमकीच्या या प्रकारानंतर पगारे कुटुंबीयांनी नाशिकरोड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संशयितांचा शोध घेण्यासाठी विविध पथके सक्रिय केली. कल्याण परिसरात संशयित असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक संदीप पवार यांच्या पथकाने तेथे जाऊन शोधमोहीम राबवली. अखेर राजू शेख, जमील रंगरेज आणि आदिल शेख यांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्यांची कथित धमकीबाबत चौकशी सुरू आहे. धमकीच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज, संभाषणाची पार्श्वभूमी आणि संबंधित व्यक्तींचा सहभाग याबाबतही पोलिसांकडून तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news