Kalwan Crop Damage | कळवण तालुक्यात पिकांनी टाकल्या माना

Kalwan Crop Damage | कोमजून गेलेले शेतातील सोयाबीन पीक, आता कितीही पाऊस आला, तरी उपयोग नाही
Crop Damage
Crop DamagePudhari File Photo
Published on: 
Updated on: 

कनाशी : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरविली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. जून - जुलैमध्ये चांगल्या पावसाने पेरण्या झाल्या, पिके भरगच्च आली, आशा वाढली. पण त्यानंतर आलेल्या कोरड्या खिंडीने सगळ्या आशेवर पाणी फिरवले, अशी अवस्था आहे.

Crop Damage
नाशिक : कनाशी शासकीय आश्रमशाळेतील मुलींचे मुख्याध्यापिकांविरोधात आंदोलन

सोयाबीन, मका, भुईमूग, उडीद, नागली, वरई अशी अंतिम टप्प्यात आलेली पिके आता पाण्याअभावी माना टाकून सुकून गेली आहेत. शेतात गेले की, शेंगा भरलेल्या दिसतात, मात्र दाणा पोसण्याआधीच झाडे कोमेजली आहेत. त्यामुळे आता कितीही पाऊस झाला, तरी उपयोग नाही, असे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांनी कर्ज काढले, सावकाराला हात-पाय जोडले, पेरणी केली, पीक हाती येण्याची वेळ आली आणि निसर्गानेच दगा दिला. कोमेजलेली पिके पाहून शेतकरी बांधावर डोक्याला हात लावून बसला आहे. यंदा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची दाट शक्यता आहे. काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल आताच सुरू झाले आहेत.

Crop Damage
Nashik News | प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या 19 रुग्णवाहिका

फक्त दुष्काळ जाहीर करून चालणार नाही

मायबाप सरकार, फक्त कागदावर दुष्काळ जाहीर करून वेळ मारून नेऊ नका, प्रत्यक्षात तातडीने पंचनामे करा, पीकविमा लवकर मंजूर करा आणि नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.

'श्रेयवादाची लढाई बंद करा':

निवडणूक आली की, याच शेतकऱ्याच्या बांधावर व्हीआयपी गाड्या आल्या नाही, तर ताफा घेऊन पायी जातात, हात जोडतात, पाय पण धरतात. यावेळी फक्त मलाच मतदान करा म्हणून गळे काढतात. मग आज तोच शेतकरी रडतोय, तेव्हा तुमचा तो पायी व्हीआयपी ताफा कुठे आहे? ती कीव कुठे गेली? असे प्रश्न शेतकरी विचारत आहेत. 'मी पाठपुरावा केला, मी मदत आणली', हे श्रेयाचे राजकारण बंद करा, अशी मागणी होत आहे.

"आता शेतात सगळं सुकून गेलंय. त्यामुळे पाऊस पडला, तरी काही उपयोग नाही. सावकाराचा हप्ता कसा फेडू? पोरांना शाळेची फी कुठून आणू? फक्त घोषणा नकोत, आमच्या बांधावर या आणि पाहा आमची काय अवस्था आहे."

- केशव गावित, कांदा उत्पादक शेतकरी, गोबापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news