

नाशिक : हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने (एचएएल) त्यांच्या सीएसआर निधीतून जिल्हा परिषदेच्या अतंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्यक वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज असलेल्या 19 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या आहेत. या रुग्णवाहिका ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची आपत्कालीन आरोग्य सेवांची उपलब्धता मजबूत करतील.
एचएएल च्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यांमध्ये उपलब्ध असलेल्या मूलभूत आरोग्य सुविधा सुधारण्याच्या दिशेने उपक्रमांना मदत देण्याचा हा एक छोटासा उपक्रम आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अशीमा मित्तल यांच्या मार्गदर्शनानुसार आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी संस्थांचा सहभाग घेतला जातो. त्यानुसार वाहनाची चावी व कागदपत्र याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. कार्यक्रमास अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, डॉ. हर्षल नेहेते डॉ. दीपक लोने डॉ. युवराज देवरे उपस्थित होते.
कळवण : कनाशी, जयदर, मोकभणगी, नवी बेज.
दिंडोरी : ननाशी
नांदगाव : बोलठाण, न्यायडोंगरी
निफाड : निमगाव वाकडा
पेठ : जोगमोडी
सुरगाणा : मानी, मनखेड, बाऱ्हे, उंबरगव्हाण
बागलाण : केळझर, आंबासन, अलियाबाद, मुल्हेर
त्र्यंबकेश्वर : आंबोली
येवला : पाटोदा