Jalgaon Crime News | आधी लग्नाचे आमिष, नंतर बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार

Jalgaon Crime News | आधी लग्नाचे आमिष, नंतर बंदुकीचा धाक दाखवून महिलेवर अत्याचार
Published on
Updated on

जळगाव पुढारी वृत्तसेवा- आधी लग्नाचे आमिष दाखवत ३२ वर्षीय महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर त्यानेच लग्नाला नकार दिला. त्यानंतर तरीही तिच्यासोबतचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आणि बंदुकीचा धाक दाखवित अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार जळगाव शहरात उघडकीला आला आहे. याप्रकरणी दि. ६ रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. या महिलेची भुमेश बापू निंबाळकर वय २६ रा. अयोध्या नगर, या तरूणाची ओळख निर्माण झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेम संबंधातून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. याचे त्याने व्हिडीओ देखील करून ठेवला होता. त्यानंतर भुमेशने महिलेला लग्नास नकार दिला. त्यामुळे महिलेने त्याच्या सोबत संबंध तोडले होते. असे असतांना भुमेशने महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी आणि मारहाण करून बंदुकीचा धाक दाखवत तिच्यावर वारंवार अत्याचार केले. ही घटना २१ मे २०२१ ते २५ मे २०२४ दरम्यानच्या काळात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत महिलेने अखेर शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अखेर ६ जून रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी भुमेश बापू निंबाळकर वय २६ रा. अयोध्या नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर ह्या करीत आहे.

हेही वाचा –

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news