रशियात नदीत बुडून ४ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू, मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश

File photo
File photo

मॉस्‍को ; पुढारी ऑनलाईन रशियातील पीटर्सबर्ग जवळील एका नदीत बुडून चार भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्‍यू झाल्‍याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर त्यांच्या कुटुंबीयांना परत करण्यासाठी येथील भारतीय मिशन रशियन अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. हे चारही विद्यार्थी वेलिकी नोवगोरोद शहरातील नोवगोरोद स्‍टेट युनिव्हर्सिटीत वैद्यकीय शिक्षण घेत होते. यात १८ ते २० वर्षीय दोन मुले आणि २ मुलींचा समावेश होता.

स्‍थानिक माध्यमांच्या वृत्‍तानुसार, एक भारतीय विद्यार्थीनी वोलखोव नदीत पोहताना किनाऱ्यापासून थोडी दूर गेल्‍यानंतर बुडू लागली. तेंव्हा तीचे इतर चार मित्र तिला वाचवण्याचा प्रयत्‍न करू लागले. तीला वाचवण्याच्या प्रयत्‍नात तीन विद्यार्थी बुडाले. दरम्‍यान एका मुलीला स्‍थानिकांनी सुरक्षितरीत्‍या बाहेर काढले.

'त्‍या' विद्यार्थ्यावर उपचार सुरू

मॉस्‍को मध्ये भारतीय दूतावासाने सोशल मीडियावरील 'एक्‍स' वर या विषयी माहिती दिली. त्‍यानुसार या घटनेत मृत्‍यूमुखी पडलेल्‍या विद्यार्थ्यांचे मृतदेह लवकरात लवकर त्‍यांच्या नातेवाईकांकडे पोहोचवण्याचा प्रयत्‍न करत असल्‍याचे म्‍हटले आहे. दरम्‍यान ज्‍या विद्यार्थ्याला वाचवण्यात यश आले आहे. त्‍याच्यावर योग्‍य उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news