Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल

Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात धडक कारवाई हाती घेतली आहे.
Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल
Published on
Updated on

जळगाव : जळगाव जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात धडक कारवाई हाती घेतली आहे. 1 एप्रिल 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्या तब्बल 678 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण 10,00,26,778 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून त्यापैकी 6,99,71,250 रुपये वसूल करण्यात आले आहेत.

Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल
Ratnagiri news: चिपळूणमध्ये अवैध वाळू उत्खनन, महसूल पथकाने केले सक्शन पंप जप्त

अवैध गौणखनिज प्रकरणी या कालावधीत 59 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच अवैध उत्खननासाठी वापरण्यात आलेली 7 यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या कारवाईमुळे अवैध उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्ह्यात एकूण 6818.27 ब्रास वाळूसाठा जप्त करण्यात आला. त्यापैकी 4039 ब्रास वाळूचा नियमानुसार लिलाव करण्यात आला असून शासनाला 60,49,933 रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. उर्वरित जप्त वाळूसाठा शासनाच्या नियमांनुसार घरकुलांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल
Donkey Ride Holi |"यंदा कोणाचा नंबर ? बीडच्या विडा गावात पुन्हा रंगणार 'जावयाची गाढवावरून मिरवणूक'; जाणून घ्या 'या' अनोख्या परंपरेबद्दल

सन 2025-26 मध्ये नोव्हेंबर-डिसेंबर 2025 दरम्यान पर्यावरण अनुमती प्राप्त 14 वाळूगटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यापैकी 13 वाळूगटांचा यशस्वी लिलाव झाला. या प्रक्रियेत 60,210 ब्रास वाळूसाठी 4,79,95,730 रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे.

तालुकास्तरीय तांत्रिक समितीकडून प्राप्त 17 वाळूगटांचे जिल्हा सर्वेक्षण अहवाल (DSR) प्रसिद्ध करण्यात आले असून भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, नागपूर यांच्याकडे खाणकाम आराखड्याच्या मंजुरीची कार्यवाही सुरू आहे.

Jalgaon Sand Mining | जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांना दणका! 678 वाहनांवर कारवाई, 10 कोटींहून अधिक दंड वसूल
Jalgaon Crime News | लिफ्ट देण्याच्या बहाण्याने प्रवाशांना लुटणाऱ्या 'पप्पू'च्या मुसक्या आवळल्या; 4 लाखांची कार जप्त

मार्च 2026 मध्ये संबंधित 17 वाळूगटांचा ई-लिलाव प्रस्तावित आहे. तसेच नव्याने प्राप्त 96 वाळूगट प्रस्ताव पर्यावरण अनुमती प्रक्रियेसाठी पर्यावरण सल्लागारांकडे पाठविण्यात आले आहेत. अवैध उत्खनन आणि वाहतूक रोखण्यासाठी 8 एप्रिल 2025 रोजीच्या वाळू धोरणानुसार महसूल, पोलिस व परिवहन विभागांच्या समन्वयातून जिल्हास्तरीय वाळू नियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली आहे.

प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून जिल्ह्यात दक्षता व गस्ती पथके स्थापन करून सातत्याने कारवाई सुरू ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननास प्रतिबंध करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news