Constitution Book | घराघरांत पोहोचतेय भारतीय संविधान; पॉकेट एडिशनला देशभरातून मोठी मागणी

Constitution Book | ग्रंथालये, शासकीय कार्यालये तसेच कायद्याच्या अभ्यासकांपुरते मर्यादित असलेले 'संविधान' आता सर्वसामान्यांच्या हातात अन् घराघरांत पोहोचू लागले आहे.
Constitution Book
Constitution Book
Published on: 
Updated on: 

नाशिक : सतीश डोंगरे

ग्रंथालये, शासकीय कार्यालये तसेच कायद्याच्या अभ्यासकांपुरते मर्यादित असलेले 'संविधान' आता सर्वसामान्यांच्या हातात अन् घराघरांत पोहोचू लागले आहे. आकाराने छोटे, मात्र आशयाने मोठे असलेले संविधानाचे 'पॉकेट एडिशन' तुफान लोकप्रिय ठरत असून, देशातील कोणत्याही सामाजिक, राजकीय चळवळीत ते आंदोलनकर्त्यांचे प्रभावी अस्त्र ठरत आहे. छोटेखानी संविधानाच्या माध्यमातून महामूल्यांचा मोठा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचत असल्याने, छोटेखानी प्रतींची छपाई, विक्री आणि वितरणाला मोठी चालना मिळत आहे.

Constitution Book
Hostel Girls Harassment | हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या तरुणींना अश्लील व्हिडिओ पाठवून धमकी; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

भारताच्या मूळ संविधानाची पहिली अधिकृत छपाई (फोटोलिथोग्राफी पद्धतीने) फक्त डेहराडून येथील 'सर्व्हे ऑफ इंडिया' या संस्थेकडून करण्यात आल्यानंतर, सद्यस्थितीतील अधिकृत छपाई भारत सरकारच्या विधी आणि न्याय मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या वैधानिक विभागामार्फत संविधानाची अद्ययावत अधिकृत प्रत तयार केली जाते.

तसेच भारत सरकारच्या मुद्रणालयातून तिची छपाई होते. मात्र, भारतीय संविधान हा एक सार्वजनिक दस्तऐवज असल्याने, तो कॉपीराइट कायद्याच्या कक्षेत येत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत देशात अनेक खासगी प्रकाशन संस्था किंवा व्यक्तींकडून 'पॉकेट एडिशन'च्या रूपात संविधानाची छपाई केली जात आहे.

विशेषतः देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २४ जून २०२४ रोजी १८ व्या लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या सुरुवातीला संसदेच्या आत व संसदेबाहेर 'कोट पॉकेट एडिशन'ची प्रत हातात घेऊन निदर्शने केली तेव्हापासून, संविधानाच्या पॉकेट एडिशनला लोकप्रियता मिळत गेली.

४ बाय ६ इंच आकाराचे हे पॉकेट एडिशन आता राजकीय कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी, सर्वसामान्यांच्या हातात झळकत असल्याने, संविधानाविषयीची जाणीव आणि लोकशाही मूल्यांप्रतीची बांधिलकी अधिक दृढ होण्यास मदत होत आहे.

या संस्थांकडून पॉकेट एडिशनची छपाई :

लखनऊ येथील ईस्टर्न बुक कंपनी, लॉ अँड जस्टिस पब्लिशिंग, युनिव्हर्सल लेक्सिसनेक्सिस, प्रोफेशनल बुक पब्लिशर्स, सेंट्रल लॉ पब्लिकेशन, सर्व्हे ऑफ इंडिया, केंद्रीय विधी विभाग, लोकसभा सचिवालय, पेंग्विन बुक कंपनी यांच्यासह महाराष्ट्रात 'के'सागर, युनिक अकॅडमी या संस्थांकडून संविधानाच्या पॉकेट एडिशनची छपाई केली जाते.

निदर्शने असो वा समारंभ सर्वत्र संविधान वकील, न्यायाधीश, कायद्याचे विद्यार्थी, संविधान बचाव अभियान, संविधान सन्मान मेळावे, सभा, मोर्चे, जनजागृती मोहिमा, अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये जागर, ग्रामसभा, नगर परिषद, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जनजागृती, वाढदिवस, विवाह, समारंभ, सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी संविधानाचे 'पॉकेट एडिशन' हमखास झळकत आहे.

२०२४ ते २०२६ मधील अधिकृत आवृत्त्या

  • २०२४ मध्ये संविधानाच्या १०६ व्या घटना दुरुस्तीपर्यंतचे (महिला आरक्षण कायदा) बदल समाविष्ट करून १ मे २०२४ रोजी संविधानाची अद्ययावत प्रत आणि सहावी पॉकेट आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली.

  • २०२५-२०२६ साली व्यय मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर १७ जून २०२६ रोजी द्विभाषिक (हिंदी-इंग्रजी) आवृत्ती आणि १५ ऑक्टोबर २०२६ रोजी इंग्रजी आवृत्ती प्रकाशित करण्यात आली. याशिवाय मराठीसह २२ अधिकृत प्रादेशिक भाषांमध्येही अद्ययावत प्रती प्रसिद्ध केल्या जातात.

Constitution Book
Nashik Fireman Recruitment | नाशिक महापालिका भरतीची प्रतीक्षा संपणार! 186 फायरमन पदांची निवड यादी आठवडाभरात

गेल्या लोकसभेत लाखांत वितरण

लखनऊ येथील ईस्टर्न बुक कंपनीने छपाई केलेल्या पॉकेट एडिशनची २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत फेब्रुवारी ते मे २०२४ या अवघ्या चार महिन्यांत ५५०० प्रतींची विक्री केल्याची नोंद आहे. समता सैनिक दलाने २०२१-२६ या कालावधीत देशभरात ३ लाख ६५ हजार पॉकेट एडिशन प्रतींचे वितरण केले. याशिवाय अमेरिका, जपान, स्वित्झर्लंडसह १२ देशांत पॉकेट एडिशनचे वितरण केले. २०२५ मध्ये केंद्राच्या विधी विभागाने मराठीसह आसामी, बोडो, कन्नड, काश्मिरी, नेपाली, ओडिया, पंजाबी, संथाली आणि तेलुगू अशा दहा भाषांमध्ये संविधान प्रकाशित केल्याने, पॉकेट एडिशनचे वितरण वाढले आहे.

संविधानाचा जागर व्हावा यासाठी दरवर्षी दहा हजार संविधानाचे वितरण बार्टीच्या माध्यमातून केले जाते. शासनाच्या मुद्रण, लेखन सामग्री विभागाकडून संविधानाच्या प्रती मागविल्या जातात. मागणी जास्त आहे, मात्र प्रती कमी उपलब्ध होत असल्याने, दहाच हजार संविधान वर्षाला वितरित केले जातात.

- डॉ. बबन जोगदंड, 'बार्टी'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.