Imtiaz Jaleel SIT | इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर

Imtiaz Jaleel SIT | इम्तियाज जलील एसआयटीच्या रडारवर
Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

टीसीएस लैंगिक छळ आणि धर्मातर प्रकरणात एमआयएम पक्षाचे नगरसेवक मतीन पटेल याची आतापर्यंत विशेष तपास पथकाकडून तीन वेळा कसून चौकशी करण्यात आली आहे. मतीन पटेलच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून मिळालेल्या डेटाच्या आधारे अनेक धक्कादायक खुलासे समोर आले असून, या प्रकरणात आता माजी खासदार इम्तियाज जलील यांनादेखील एसआयटीकडून चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली आहे. एसआयटीने दाखल केलेल्या पहिल्या दोषारोपपत्रात जलील यांच्या नावाचा उल्लेख आहे.

Imtiaz Jaleel
Nashik Road Water Pipeline | जेल रोडला जलवाहिनी फुटली; चार दिवसांपासून पाणी वाया

या संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यामध्ये एसआयटीने आत्तापर्यंत एकूण आठ आरोपींना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध न्यायालयात मुख्य दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मोबाइल डेटा आणि तांत्रिक तपासातून समोर आलेल्या नवीन पुराव्यांच्या आधारे, पोलिस येत्या काही दिवसांत न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्रदेखील दाखल करणार आहेत.

दुसरीकडे, आरोपी निदा खानला घर मिळवून दिल्याच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या मतीन पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील यांचे नाव या प्रकरणात जोडले जात असल्याच्या दाव्यांना पूर्णपणे फेटाळून लावले आहे. निदा खान ही इम्तियाज जलील यांची नातेवाईक असल्याचा आरोप चुकीचा आणि निराधार आहे, असे पटेल याने स्पष्ट केले आहे. मात्र, पोलिसांनी दाखल केलेल्या पहिल्या दोषारोपपत्रात माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नावाचा थेट उल्लेख करण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांनी या प्रकरणात दाखल एकूण ९ गुन्ह्यांपैकी पहिल्या गुन्ह्यात सुमारे ३,५०० पानांचे पहिले दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Imtiaz Jaleel
Major Boost for Nashik Kumbh Infrastructure | साधुग्राम भूसंपादनासाठी २,२६७ कोटी मंजूर

चौकशीला सामोरे जाणार : जलील

माझे नाव आरोपपत्रात आल्याची मला कल्पना नाही. पण मी कोणत्याही प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास पूर्णपणे तयार आहे. मी आधीच मान्य केले आहे की, मी त्या मुलीच्या (निदाच्या) कुटुंबाला भेटलो होतो आणि जे मला योग्य वाटते, त्यासाठी माझा लढा सुरूच राहील. अशी प्रतिक्रिया सौदी अरेबियात हज यात्रेसाठी गेलेल्या इम्तियाज जलील यांनी दिली आहे.

'इम्तियाज जलील साहेबांना विचारावे लागेल'

तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी फरार निदा खानचा शोध घेतला असता, एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने निदाला पोलिसांपासून लपवण्यासाठी थारा दिल्याचे समोर आले होते. जेव्हा गुन्हे शाखेने मतीन पटेलला छत्रपती संभाजीनगर येथे चौकशीसाठी बोलावले आणि निदा खान कुठे आहे, असे विचारले होते, तेव्हा पटेल याने वारंवार इम्तियाज जलील साहेबांना विचारावे लागेल असे उत्तर दिले होते. कसून चौकशीनंतर मतीन पटेल याने पोलिसांना छत्रपती संभाजीनगरमधील नारेगाव-कौसर सिडको भागातील त्या जागेचा पत्ता दिला होता, जिथे निदा आणि तिचे कुटुंबीय लपले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news