Ashok Kharat case| भोंदू अशोक खरातला २६ मे पर्यंत ईडी कोठडी, कोर्टाच्या प्रश्नावर निरुत्तर

ईडीने केली होती १० दिवसांची कोठडीची मागणी
Ashok Kharat case
भोंदू बाबा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी आणि अशोक खरातला २६ मे पर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ED) कोठडी सुनावली आहे.Pudhari
Published on
Updated on

Ashok Kharat ED custody

नाशिक : भोंदू बाबा आणि मनी लॉड्रिंग प्रकरणातील आरोपी आणि अशोक खरातला २६ मे पर्यंत अंमलबजावणी संचालनालय (ED) कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने न्यायालयात १० दिवसांची कस्टडी मागितली होती, परंतु न्यायालयाने ६ दिवसांची कोठडी मंजूर केली आहे.

कोर्टात सुनावणीवेळी काय घडले?

ईडीच्या वकिलांनी तपासाचे गांभीर्य लक्षात घेता अशोक खरातची १० दिवसांची कोठडी मागितली. खरातच्या वकिलांनीही युक्‍तीवाद केला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद विचारात घेतल्‍यानंतर ईडीची १० दिवसांची मागणी तूर्तास नामंजूर करत, न्यायालयाने खरातला ६ दिवसांची म्हणजेच २६ मे पर्यंत ईडी कोठडी सुनावली.

Ashok Kharat case
Kalpana Kharat: कल्पना खरातला दिलासा नाहीच! अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला, 'पतीच्या कृत्यांशी माझा संबंध नाही', कोर्टात दावा

अशोक खरात कोर्टात पहिल्यांदाच बोलला

"माझ्याकडे आलेले पैसे मी समता पतसंस्थेच्या मॅनेजरला दाखवले होते. ही सहकारी बँक असून येथे ९ टक्के व्याज मिळते, असे सांगून त्यांनीच मला हे पैसे वेगवेगळ्या अकाउंटमध्ये ठेवण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार मी ते पैसे ठेवले; पण मला सगळ्या अकाउंटला नॉमिनी का करण्यात आले, याबद्दल मला काहीही माहिती नाही. आता तपास झालाय. मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, एवढंच मला माहिती आहे," अशी कबुली भोंदू अशोक खरात याने न्यायालयात दिली.

Ashok Kharat case
Shirdi Fraud Case | नाशिकच्या भोंदूबाबाचे 'ईडी' कनेक्शन! प्रतिभा चाकणकरांची चौकशी; 2 कोटींच्या संशयास्पद व्यवहारांचा पेच

तुमच्‍यावर काय आरोप आहेत ते समजतंय का? खरातला न्‍यायालयाचा सवाल

समता पतसंस्थेतील संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार आणि खात्यांमधील कथित संशयास्पद रकमेप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी "तुमच्यावर नेमके काय आरोप ठेवण्यात आले आहेत, हे तुम्हाला समजतंय का?" या प्रश्नानंतर खरात याने न्यायालयात आपली बाजू मांडली.

Ashok Kharat case
Nashik Ashok Kharat Case | भोंदू अशोक खरात याच्या बँक लॉकरवर ईडीचा छापा

मॅनेजरच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खात्यांत पैसे ठेवले!

खरातने न्यायालयात सांगितले की, "माझ्याकडे जी रक्कम आली होती, त्याबद्दल मी स्वतः समता पतसंस्थेच्या मॅनेजरला माहिती दिली होती. माझ्याकडे असे पैसे आहेत. त्यावर मॅनेजरने ही एक सहकारी बँक असून येथे ९ टक्के इतके चांगले व्याज मिळते, असे सांगून मला पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. हे पैसे एकाच ठिकाणी न ठेवता वेगवेगळ्या खात्यांमध्ये (अकाउंट्स) ठेवण्यास त्यांनीच मला सांगितले होते आणि त्यानुसारच मी ती रक्कम बँकेत ठेवली होती."

Ashok Kharat case
Ashok Kharat case | भोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये मिळाले घबाड; 1.10 कोटीचे दागिने, 5,500 अमेरिकन डॉलर्स

'त्या' नॉमिनीबद्दल मला काहीच ठाऊक नाही!

"जर सर्व काही नियमानुसार होते, तर तुम्हाला या सगळ्या अकाउंटला 'नॉमिनी' (वारसदार) करण्याचे कारण काय होते?" या प्रश्‍नावर खरात म्‍हणाला. त्याबद्दल मला खरोखर काहीही माहिती नाही. या प्रकरणाचा तपास झाला. आता मी आणि आवारे जेलमध्ये आहोत, यापलीकडे मला काहीही माहीत नाही." असे खरातने यावेळी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news