Ashok Kharat case | भोंदू खरातच्या बँक लॉकरमध्ये मिळाले घबाड; 1.10 कोटीचे दागिने, 5,500 अमेरिकन डॉलर्स

Ashok Kharat Case
Ashok Kharat CasePudhari
Published on
Updated on

नाशिक : लैंगिक अत्याचार, खंडणी आणि आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमध्ये अटक असलेल्या भोंदू अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्या नावावरील नाशिकमधील बँक लॉकरवर ‘ईडी’ने छापा टाकत कोट्यवधीचे घबाड जप्त केले. ‘ईडी’ने या कारवाईत 1.10 कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने, 5,500 अमेरिकन डॉलर्स व सुमारे 1.89 लाख रुपयांचे चांदीचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईनंतर अशोक खरात प्रकरणात आर्थिक व्यवहारांतही मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक, नाशिक पोलिस आणि ‘ईडी’ संयुक्तपणे करीत आहेत. तपासादरम्यान अशोक खरातच्या नियंत्रणाखालील तब्बल 60 बँक खात्यांमधून संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. अनुयायांना धार्मिक आणि आध्यात्मिक वस्तू अवाजवी दराने विकणे, भीती दाखवून खंडणी उकळणे तसेच विविध मार्गांनी मोठ्या प्रमाणात पैसा जमा केल्याचा आरोप तपासात पुढे आला आहे. खरात सध्या पोलिस कोठडीत असून, त्याच्याकडे सातत्याने चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत असल्यामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडत आहे. आर्थिक व्यवहार, मालमत्ता आणि बँक खात्यांची सखोल चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news