Nashik Politics | राज्यपालांनी तिफनवर केली ज्वारीची पेरणी

Nashik Politics | दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता.
Nashik Politics | राज्यपालांनी तिफनवर केली ज्वारीची पेरणी
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथील शेतकरी सम्राट राऊत यांच्यासाठी आनंदाचा दिवस होता. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांच्या शेताला भेट देत त्यांना सुखद धक्का दिला. एवढेच नव्हे, तर तिफनवर ज्वारीची पेरणी करून आपणास शेती आणि शेतकरी यांच्याविषयी असलेल्या आत्मीयतेचे दर्शन घडवले.

Nashik Politics | राज्यपालांनी तिफनवर केली ज्वारीची पेरणी
Sinnar Leopard Rescue | सिन्नरच्या कहांडळवाडीत दहशत माजवणारा बिबट अखेर जेरबंद; शेतकऱ्यांना दिलासा

इतरही शेतकऱ्यांशी शेतीविषयी चर्चा करताना त्यांना नैसर्गिक शेतीकडे वळण्याचे आवाहन केले. राज्यपालांच्या भेटीने शेतकऱ्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. जिल्हा दौऱ्यात ग्रामस्थांकडून मिळालेल्या प्रेमाने आणि आदरातिथ्याने भारावून गेल्याची भावना देवव्रत यांनी व्यक्त केली. आपण स्वतः शेतकरी असून, अनेक देशी गायी असल्यामुळे संपूर्णपणे नैसर्गिक शेती करतो.

Nashik Politics | राज्यपालांनी तिफनवर केली ज्वारीची पेरणी
Nashik Political News | नाशिकमध्ये ठाकरे बंधूंची 9 जानेवारीला संयुक्त सभा

ती लाभदायी असल्यामुळे शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन केले, यावेळी राऊत कुटुंबाने नैसर्गिक शेतीत पिकविलेल्या वस्तूंची भेट देत राज्यपाल देवव्रत यांचा सत्कार केला. राज्यपालांची ही भेट स्मरणीय करण्यासाठी पावरी हे आदिवासी बांधवांचे पारंपरिक वाद्य त्यांना भेट देण्यात आले. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, राज्यपालांचे सचिव प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, आत्माचे प्रकल्प संचालक अभिमन्यू काशीद उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news