

सिन्नर: तालुक्याच्या पूर्व भागातील कहांडळवाडी येथे भाऊसाहेब गुंजाळ व महेंद्र कहांडळ यांच्या शेत गट नंबर २१४/१४३/१/१ येथे तसेच ब्राह्मणवाडे परिसरात गेल्या काही दिवसांपासून दहशत माजवणारा बिबट अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे.
ब्राह्मणवाडे परिसरामध्ये धुमाकूळ घातलेल्या बिबट्याला शुक्रवारी (दि.२) बापू पंढरीनाथ गिते यांच्या सामाईक मालकीच्या गट नंबर ५४ मध्ये वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात यशस्वीरीत्या रेस्क्यू करण्यात आले. विवट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच परिसरातील शेतकरी वर्ग व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
सदर कारवाई उपवनसंरक्षक सिद्धेश्वर सावर्डेकर, सहाय्यक वनसंरक्षक कल्पना वाघोरे तसेच सिन्नर वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. रेस्क्यू मोहिमेत वनपाल तानाजी भुजबळ, वनरक्षक गोविंद पंढरे, वनमजूर रामनाथ साहणे व पोलीस पाटील कमलाकर रामराजे यांनी मेहनत घेतली. बिबटे मोहदरी वनोद्यानात जेरबंद करण्यात आलेल्या विवट्याला घटनास्थळावरून सुरक्षितरित्या सिन्नर येथील मोहदरी वन उद्यानात हलवण्यात आले आहे