

Gold will reach Rs 1.25 lakh on the occasion of Dussehra
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारत- अमेरिका व्यापार करारातील अनिश्चितता आणि आयातदारांकडून वाढलेल्या डॉलरच्या मागणीचा थेट परिणाम सोने दरवाढीवर होत असून, अवघ्या पाचच दिवसांत सराफ बाजारात सोने दरात तब्बल दोन हजार ७८० रुपयांची वाढ नोंदविली गेली आहे. दरवाढीचा वेग २० टक्क्यांपेक्षा अधिक असून, तो असाच कायम राहिल्यास आगामी दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने सव्वा लाखांचा टप्पा गाठेल, असा अंदाज जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.
आंतरराष्ट्रीय घडामोडींवर अवलंबून असलेल्या सोने दरवाढीला जागतिक आर्थिक अस्थिरता, अमेरिका व युरोपातील व्याजदरातील अनिश्चितता, अमेरिकेने भारतावर लादलेले ५० टक्के आयातशुल्क आणि मध्यपूर्वेतील युद्धजन्य तणाव या प्रमुख बाबी कारणीभूत ठरत आहेत.
डॉलर कमकुवत झाल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने सातत्याने महाग होत आहे. त्यातच रुपयाचा दर घसरल्याने, भारतीय सराफ बाजारात ही वाढ आणखीनच तीव्र जाणकारांच्या मते, जागतिक तणाव व वाढती मागणी कायम राहिल्यास सोने आगामी दसऱ्याच्या मुहूर्तावर एक लाख २० हजार ते एक लाख २५ हजार प्रति तोळा या दरावर पोहोचू शकेल. तर चांदी १ लाख ३५ हजार ते एक लाख ५० हजार प्रति किलोचा स्तर गाठेल.