Gas Booking Delay | गॅस बुकिंग करा... अन् वाट पाहत बसा

वणीतील गॅस एजन्सी विरोधात सप्तशृंगगड ग्रामस्थांचा संताप
LPG Gas
LPG Gas Pudhari
Published on
Updated on

सप्तशृंगगड : 'घरपोच सेवेचे पैसे भरायचे... पण सिलिंडर मात्र स्वतःच्या डोक्यावर वाहून न्यायचा' अशी संतप्त भावना व्यक्त करत सप्तशृंगगड ग्रामपंचायतीने वणी इण्डेन गॅस एजन्सीच्या ढिसाळ व असमाधानकारक वितरण व्यवस्थेविरोधात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याकडे तक्रारीचे निवेदन सादर केले आहे. गडावरील शेकडो ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीमुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवेदनानुसार, गॅस बुकिंग करूनही अनेकदा विहित मुदतीत सिलिंडरचा पुरवठा होत नसल्याची ग्राहकांची तक्रार आहे. घरपोच सेवा देणे बंधनकारक असतानाही ती प्रत्यक्षात मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. घरपोच सेवेचे शुल्क आकारले जात असतानाही ग्राहकांना सिलिंडर उचलून न्यावे लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

महिला, ज्येष्ठ नागरिक आणि दिवसभर मजुरी करणाऱ्या कुटुंबांची मोठी गैरसोय होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गॅस वितरणासाठी कोणताही निश्चित दिवस किंवा वेळ नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राहकांना दिवसभर कामधंदा सोडून गॅसच्या वाहनाची वाट पाहावी लागते.

LPG Gas
Saptashrungi Dindi | सप्तश्रृंगगड, वणी परिसरातून प्रथमच दिंडीचे प्रस्थान

वाहन नेमके कधी येणार, किती वेळ थांबणार आणि कोणत्या भागात वितरण होणार, याची कोणतीही स्पष्ट माहिती नसल्याने नागरिक अक्षरशः अनिश्चिततेत दिवस घालवत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. या समस्योबाबत संबंधित एजन्सीकडे ग्रामपंचायतीने वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. मात्र अपेक्षित सुधारणा झालेली नाही.

समजेपर्यंत साठा समाप्त

गडावर गॅस वितरणासाठी येणारे वाहन बहुतांश वेळा मारुती मंदिरासमोर थांबत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे शिवालय तीर्थ, पहिली पायरी, म्हमादेवी चौक, नागेश्वर चौक, चांदणी चौक, आश्रम परिसर आणि इतर भागातील नागरिकांना गॅस वाहन आल्याची माहितीच मिळत नाही. तोपर्यंत उपलब्ध सिलिंडर संपल्याची वेळ अनेकांवर येते. सिलिंडर मिळाला तरी तो घरपोच न देता स्वतः वाहून न्यावा लागत.

LPG Gas
Illegal Weapons Seized | दोन गावठी कट्टे, तीन जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक; शस्त्रविक्रेता फरार

सप्तशृंगगडवरील ग्राहकांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. हा प्रश्न स्थानिक पातळीवर न ठेवता राज्य शासनापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते. याच अनुषंगाने मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी या प्रकरणाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचे आश्वासन दिले आहे.

-संदीप बेनके, उपसरपंच

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news