Gangapur Road Society | उच्चभ्रू सोसायटीत भेदभावची कीड

Gangapur Road Society | गंगापूर रोडवरील प्रकार; भाडेकरूंना घरमालकांच्या तुलनेत दुय्यम वागणुकीचा आरोप
Housing Societies
Housing SocietiesPudhari
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भेद दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची ओळखपत्रे देण्याचा निर्णय गंगापूर रोड परिसरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत करण्यात आल्याचा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केला आहे.

Housing Societies
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

घरमालकांना हिरवे, भाडेकरूंना लाल रंगाचे ओळखपत्र देण्याच्या 'कथित' निर्णयावर त्यांनी आक्षेप घेतला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास पोलिसांकडे जाण्याचा इशारा दिला आहे.
गंगापूर रोड परिसरातील एका गेटेड कम्युनिटीमधील सोसायटीच्या सभासदांची बैठक दि. ११ ऑक्टोबरला झाली होती.

यात विविध निर्णय घेण्यात आले. त्यापैकी घरमालक आणि भाडेकरूंसाठी वेगवेगळ्या रंगांची ओळखपत्रे बाळगणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यानुसार, घरमालकांना हिरव्या रंगाचे, भाडेकरूंना लाल रंगाचे ओळखपत्र देण्याची तरतूद असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हा निर्णय अद्याप लागू झालेला नसला, तरी त्यासंबंधीची माहिती समाजमाध्यमांद्वारे सोसायटीच्या सभासदांपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येते. या निर्णयामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

मात्र, रंगांच्या आधारे घरमालक आणि भाडेकरूमध्ये वेगळी ओळख निर्माण करण्याची पद्धत भेदभावाला प्रोत्साहन देणारी ठरू शकते, अशी भूमिका चांदगुडे यांनी मांडली आहे. भारतीय संविधानातील समानतेच्या तत्त्वाचा आणि मानवी प्रतिष्ठेचा विचार करता अशा प्रकारच्या निर्णयाचा फेरविचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

"सोसायटीत घरमालक आणि भाडेकरूंमध्ये नेहमीच भेदभाव केला जात असल्याचे पीडितांचे म्हणणे आहे. उच्चभ्रू लोकांत अशा प्रकारे भेदभावनाची मानसिकता दिसून येणे ही आधुनिक अंधश्रद्धा आहे. संबंधित सोसायटीने हा निर्णय मागे घेतला नाही, तर आम्हाला पोलिसांकडे जावे लागेल."

- कृष्णा चांदगुडे, कार्यवाह, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती

Housing Societies
Godavari River Pollution | गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नाशिक मनपा आयुक्तांना कडक निर्देश

भाडेकरूंना दुय्यम वागणूक

संबंधित सोसायटीत भाडेकरूंना घरमालकांच्या तुलनेत दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असल्याचा काही भाडेकरूंचे म्हणणे असण्याचा दावा करण्यात आला आहे. वारंवार तिरस्काराचा सामना करावा लागत असल्याची तक्रारही काही भाडेकरूंनी केल्याचे सांगितले जाते.

या पार्श्वभूमीवर भाडेकरूंसाठी स्वतंत्र रंगाचे ओळखपत्र देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, सोसायटीच्या व्यवस्थापनाकडून या निर्णयामागील भूमिका किंवा त्यासंबंधीचे अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news