Kesari Winner Ganesh Ahire | धाकट्याला चितपट करत गणेश उत्तर महाराष्ट्र केसरी

 Kesari Winner Ganesh Ahire | पहिल्यांदाच दोघा सख्ख्या भावांत लढत ; लहान बंधू अनिल अहीरे उपविजेता
 Kesari Winner Ganesh Ahire
 Kesari Winner Ganesh Ahire
Published on: 
Updated on: 

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
सटाणा येथील कुस्तीपटू गणेश अहिर आणि त्याचाच बंधू अनिल अहिर यांच्यात उत्तर महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत रंगली आणि या कुस्तीमुळे सटाणा তালुक्याला मानाची गदा पहिल्यांदा मिळाली. मोठा बंधू गणेश लहान बंधू अनिलला चितपट करत उत्तर महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. कुस्ती निकाली लागताच उपस्थित कुस्तीप्रेमींनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

 Kesari Winner Ganesh Ahire
Shetkari Samriddhi Railway | देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी रेल्वेची ऐतिहासिक भरारी; 11 महिन्यांत 100 फेऱ्या पूर्ण!

गुरू हनुमान आखाड्याचे वस्ताद ज्ञानेश्वर शिंदे, साकूर फाटा यांचे दोन्ही बंधू शिष्य असून, विजेत्या मल्लाळा रोख रुपये ५१ हजार व मानाची गदा देण्यात आली. केसरी गटाचा तिसरा क्रमांक नीलेश उगाडे याने पटकावला. साकूर फाटा येथील गुरू हनुमान आखाड्याचे वस्ताद व वंजारवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर शिंदे यांच्या वतीने मानाची गदा विजेत्यांना देण्यात आली.

नाशिकरोड येथील मनपा शाळा क्रमांक १२५ च्या मैदानावर १५ व्या उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत दुसऱ्या दिवशी कुमार व खुल्या गटाच्या लढती रंगल्या. यावेळी आशियाई स्पर्धेतील पदकविजेते आणि अयोध्या हनुमानगढी येथील कुस्तीच्या आखाड्यात नावाजालेले महंत संजयदास महाराज, राष्ट्रीय स्तरावरील नावाजालेले कुस्तीपटू आणि हनुमानगढीचे बालब्रह्मचारी साधू, हनुमानगढी येथील श्री महंत ज्ञानदासजी महाराज, पश्चिम बंगालच्या गंगासागर कपिलमुनी आश्रमाचे प्रमुख तसेच कुस्तीपटू महंत हेमंतदास महाराज आदी उपस्थित होते.

 Kesari Winner Ganesh Ahire
Deolali Accident News | देवळाली कॅम्पमध्ये काळजाचा थरकाप! भरधाव कार रसाच्या गुऱ्हाळावर आदळली; विक्रेत्याचा जागीच मृत्यू

तसेच मनपा नगरसेवक दिनकर पाटील, प्रभाग सभापती रमेश धोंगडे, कुस्तीगीर परिषदेचे सचिव गोरक्षनाथ बलकवडे, अजित गायकवाड, जयश्री गायकवाड, सूर्यकांत लवटे यांच्यासह उत्तर महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष उत्तम दळवी, कोंडाजी डोमसे, भगवान दोंदे, रवींद्र मोरे, आयोजक ज्ञानेश्वर बोराडे, ईश्वर शिरसाठ, बाळासाहेब जुंदरे आदी उपस्थित होते.

स्पर्धेत पंच म्हणून अंबू पवार, ज्ञानेश्वर शिंदे, मधुकर वाघ, चेतक बलकवडे, दिलीप सोनवणे, बाळू बिन्नर, किरण मते, गणपत घुमळे, रमेश बोराडे, रघुनाथ गायकवाड, दिलीप सोनवणे यांनी जबाबदारी सांभाळली. सूत्रसंचालन किरण मते यांनी केले.

गटनिहाय निकाल:

  • २५ किलो: शिवांश गुडघे, अनिकेत गटकाळ, आरव सोनवणे

  • ३० किलो: अर्णव भुसारे, विनोद गुळवे, वीर बढाले

  • ३५ किलो: यश गवळी, कृष्णा ढोन्नर, अबू बकर शेख

  • ४० किलो: मिहीर औशीकर, साहिल झाडे, शंतनू गायकवाड

  • ४५ किलो: स्वप्नील गुरकुले, शुभम झाडे, रुद्र बढाले

  • ५० किलो: सार्थक माळसुरे, मंदार मस्के, विष्णू जाधव

  • ५५ किलो: जयेश बोराडे, सागर भले, सागर गायकवाड

  • ६० किलो: दादासाहेब आचपळे, शेख अमन, बाळासाहेब कांदे

  • ६५ किलो: शुभम आचपळे, यश ढाकणे, युवराज वाघ

  • ७० किलो: मनोज थिवंदे, पवन ढोन्नर, सार्थक तुपे

  • ७५ किलो: वैभव तुपे, संदीप होलगड, वरुण फुलफगारे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.