Deolali Accident News | देवळाली कॅम्पमध्ये काळजाचा थरकाप! भरधाव कार रसाच्या गुऱ्हाळावर आदळली; विक्रेत्याचा जागीच मृत्यू

Deolali Accident News | येथील रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिराजवळ रस्त्यालगत असलेल्या रसाच्या गुऱ्हाळाला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली.
Accident News
Accident NewsPudhari
Published on
Updated on

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा

येथील रेस्ट कॅम्प रोडवरील रेणुका देवी मंदिराजवळ रस्त्यालगत असलेल्या रसाच्या गुऱ्हाळाला एका भरधाव कारने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी गुऱ्हाळ चालक मच्छिंद्र आबाराव रोडगे (६७) यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी वाहन चालक तुकाराम वाजेविरोधात देवळाली कॅम्प पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Accident News
Nashik BJP MLAs Protest| 'त्यांच्या घरांवर बुलडोझर फिरवा!'; नाशिकमधील गुन्हेगारांविरोधात भाजप आमदार आक्रमक

भगूरहून-देवळाली कॅम्पच्या दिशेने वेगाने जात असलेल्या ब्रेझा (एमएच १५, जेके ६७१८) कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या उसाच्या गुऱ्हाळावर जाऊन आदळली.

अपघात इतका भयंकर होता की, गुहऱ्हाळ मशीन, लाकडी गाडी व इतर साहित्य चक्काचूर झाले. यात गुऱ्हाळ चालक मच्छिंद्र रोडगे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना मुलाने तत्काळ कॅटोन्मेंट रुग्णालयात दाखल केले; मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

Accident News
New MIDC Police Station Nashik | एमआयडीसी ठाण्यांतर्गत चार पोलिस चौक्या

या प्रकरणी वाहन चालक तुकाराम वाजे (रा. पांढुर्ली) याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. मच्छिंद्र रोडगे हे मूळचे परभणी जिल्ह्यातील असून, गत १५ वर्षांपासून ते देवळालीच्या रेस्ट कॅम्प रोडवरील देवी मंदिर परिसरात राहतात मोलमजुरीसह रसाचे गुऱ्हाळ चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करीत होते. या घटनेमुळे रोडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अतिक्रमणाचा विळखा

नाशिक, सिन्नर, इगतपुरी तालुक्याला जोडणाऱ्या ५८ गावांचा भगूर येथील हा मुख्य रस्ता आहे. त्यावर साइडपट्ट्या नाहीत. रस्ता रुंदीकरण गरजेचे आहे.

गतिरोधकाची मागणी

भगूर - देवळाली कॅम्प रोड काँक्रिटीकरण झाल्याने वाहने सुसाट धावतात. या ठिकाणी गतिरोधक टाकण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अॅड. बाळासाहेब आडके, सुरेश कदम, रिपाइं नेते सुरेश निकम, सचिन गोडसे, अतुल बोराडे, अर्जुन संगमनेरे, अंबादास कसबे, हेरंब कुलकर्णी, मयंक उपाध्याय यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news