Fruit Vegetable Seed | फळे-भाजीपाला, बियाणे निर्यातीतून सुमारे 756 कोटींचे परकीय चलन..!

Fruit Vegetable Seed | प्रतिकूल हवामानातही कृषी निर्यातीला बळ; तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांचा हातभार
Fruit Vegetable Seeds
Fruit Vegetable SeedsFruit Vegetable Seeds
Published on: 
Updated on: 

लासलगाव : राकेश बोरा

एप्रिल ते जुलै २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत देशातून ४ हजार २७ मेट्रिक टन फळे व भाजीपाला बियाण्यांची निर्यात झाली असून, त्यातून देशाला ७५६ कोटी रुपयांचे परकीय चलन मिळाले आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील मूल्यवर्धित उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळत असल्याचे चित्र आहे.

Fruit Vegetable Seeds
Lasalgaon Onion Market Prices | लासलगाव ते दिल्ली स्पेशल ट्रेन! एनसीसीएफकडून 840 टन कांदा राजधानीकडे रवाना

भारताची ओळख कृषिप्रधान देश म्हणून असून, देशातील विविध प्रकारच्या कृषिमालाला जागतिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. फळे, भाजीपाला तसेच त्यांच्या बियाण्यांची निर्यातही सातत्याने वाढत आहे. भारतामध्ये विविध हवामान परिस्थिती आणि भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे फळे, भाजीपाला आणि विविध पिकांच्या बियाण्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते.

देशातून विविध प्रकारचा कृषिमाल जगातील सुमारे १७० देशांमध्ये निर्यात केला जातो.
पारंपरिक कृषिमालाबरोबरच उच्च दर्जाची बियाणे, प्रक्रिया केलेली उत्पादने आणि मूल्यवर्धित कृषी उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत स्थान मिळत आहे.

निसर्गाच्या लहरीपणावर तंत्रज्ञानाची मात:

शेती व्यवसायापुढील सर्वात मोठे आव्हान म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. मागील काही वर्षांत अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा आणि हवामानातील अनिश्चित बदलांचा शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. मात्र, आधुनिक कृषी तंत्रज्ञानामुळे या आव्हानांवर मात करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सुधारित वाणांचा वापर, ठिबक सिंचन, आधुनिक यंत्रसामग्री, शास्त्रीय पीक व्यवस्थापन, रोग-कीड नियंत्रण, उत्पादनानंतरची आधुनिक हाताळणी यामुळे उत्पादनाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यास मदत होत आहे. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही कृषी उत्पादनाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या संधी वाढत आहेत.

मूल्यवर्धित कृषिमालाला संधी:

फळे आणि भाजीपाला बियाणे हे केवळ कृषी निविष्ठा नसून, उच्च मूल्य असलेले कृषी उत्पादन आहे. दर्जेदार बियाण्यांची मागणी वाढल्यामुळे या क्षेत्रात संशोधन, उत्पादन, प्रक्रिया आणि निर्यातीस मोठी संधी निर्माण झाली आहे.

भारतीय बियाणे उद्योगाने गुणवत्ता, उत्पादनक्षमता आणि विविध हवामान परिस्थितींना अनुरूप वाण विकसित करण्यावर भर दिल्यास जागतिक बाजारपेठेतील संधी आणखी वाढू शकतात. भारतातून फळे व भाजीपाला बियाणे यांची निर्यात प्रामुख्याने नेदरलँड्स, यूएसए, बांग्लादेश, थायलंड, स्पेन, जपान, फ्रान्स, केनिया या देशांमध्ये होते.

Fruit Vegetable Seeds
Lasalgaon Market | लासलगाव बाजार समितीत खुर्चीचे राजकारण; छगन भुजबळांनी दोन्ही गटांना सुनावले खडे बोल!

तक्ता - भाजीपाला (मे.टन) व बियाणे निर्यात आकडेवारी:

  • सन २१-२२: २१,०५२ मे.टन | ₹८४३ कोटी

  • सन २२-२३: २१,४४५ मे.टन | ₹९४७ कोटी

  • सन २३-२४: १७,७११ मे.टन | ₹१,०९९ कोटी

  • सन २४-२५: २२,७९८ मे.टन | ₹१,३४६ कोटी

  • सन २५-२६: १८,१८५ मे.टन | ₹१,४५५ कोटी

बाजारपेठ शेताच्या जवळ:

केवळ उत्पादन वाढवणे पुरेसे नसून, उत्पादित माल योग्य वेळी आणि योग्य गुणवत्तेसह बाजारपेठेत पोहोचणेही महत्त्वाचे आहे. यासाठी देशात कृषी निर्यातीशी संबंधित पायाभूत सुविधांचा विस्तार केला जात आहे. विमानतळे, बंदरे, ड्राय पोर्ट, क्वारंटाइन प्रयोगशाळा, कोल्ड चेन, पॅकहाउस आणि फूड पार्क यांसारख्या सुविधांमुळे कृषिमालाची निर्यात प्रक्रिया अधिक सक्षम होत आहे.

शेतकऱ्यांचा निर्यात प्रक्रियेत वाढता सहभाग:

कृषी निर्यातीचा लाभ केवळ व्यापारी किंवा निर्यातदारांपुरता मर्यादित न राहता, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना निर्यातक्षम उत्पादन, गुणवत्ता मानके, पॅकिंग, अवशेषमुक्त उत्पादन आणि बाजारपेठेची माहिती देण्यावर भर दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news