Lasalgaon Market | लासलगाव बाजार समितीत खुर्चीचे राजकारण; छगन भुजबळांनी दोन्ही गटांना सुनावले खडे बोल!

Lasalgaon Market | लासलगाव बाजार समितीत खुर्चीच्या राजकारणावर भुजबळांचे दोन्ही गटांना खडे बोल
Agricultural Income Market Committee Lasalgaon, Distt. Nashik
कृषि उत्पन्न बाजार समिती लासलगाव, जि. नाशिकfile photo
Published on
Updated on

लासलगाव : राकेश बोरा
लासलगाव बाजार समिती सभापती - उपसभापती पदाची निवडणूक दोनदा स्थगित झाली आहे. संचालक मंडळात खुर्चीसाठी 'संगीत खुर्ची'चा खेळ सुरू असून, निवडणुकीच्या या राजकीय गोंधळावर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खास मिश्किल शैलीत बाजार समितीच्या संचालक मंडळाची चांगलीच 'हजेरी' घेतली.

Agricultural Income Market Committee Lasalgaon, Distt. Nashik
Nashik Simhastha Kumbh Mela | सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक सज्ज; 30 हजारांहून अधिक पोलिसांच्या निवासाचे नियोजन पूर्ण

'आत्ताच सगळं का पाहिजे?' असा प्रश्न करीत भुजबळांनी एकीकडे इच्छुकांच्या घाईला टोला लगावला, तर दुसरीकडे 'एकमेका करू साहाय्य, अवघे धरू सुपंथ' असा सल्ला देत खुर्चीपेक्षा बाजार समिती आणि शेतकऱ्यांचे हित मोठे असल्याची जाणीव करून दिली. सभापती-उपसभापती निवडणुकीचा सुरू असलेल्या आखाड्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी चांगलाच समाचार घेत दोन्ही गटांना खडे बोल सुनावले.
बाजार समिती निवडणुकीत एक गट इकडे, दुसरा गट तिकडे... कालपर्यंत एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे असलेले नेते निवडणुकीची वेळ येताच वेगवेगळ्या दारात दिसू लागले. कोणी न्यायालयात धाव घेतली, कोणी पणन मंत्र्यांच्या दरबारात हजेरी लावली आणि कोणी थेट मंत्र्यांनाच, 'साहेब, तुम्ही म्हणाल ते मान्य!' असा शब्द दिला.

पण राजकारणात शब्दांपेक्षा खुर्ची मोठी ठरली की, समीकरणे क्षणात बदलतात, हे बाजार समितीच्या सध्याच्या राजकार्याने पुन्हा दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी दोन्ही गटांना अक्षरशः आरसा दाखवला. त्यांनी 'तुम्हाला काय करायचे ते करा, जेवढे भांडायचे तेवढे भांडा; पण शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, एवढे लक्षात ठेवा', असा इशाराच भुजबळांनी दिला.
भुजबळांनी याच मुद्द्यावर संचालकांना सुनावले; राजकारणात थांबावे लागते, संधी येतात आणि प्रत्येकाला कधी ना कधी संधी मिळते. आज एक सभापती, उद्या दुसरा; आज एका नावाची पाटी, उद्या दुसऱ्याची. यात राजकारण संपत नाही, उलट सहकार्याने काम केले, तर संस्थेची प्रतिष्ठा वाढते.

शेवटी बाजार समिती गेटवर येणारा शेतकरी कोणत्या गटाचा आहे, हे पाहिले जात नाही, त्याच्या कांद्याला किती भाव मिळतो, त्याला किती सुविधा मिळतात आणि त्याच्या मालाचे नुकसान होते का, हेच त्याच्यासाठी महत्त्वाचे असते. म्हणूनच सध्या बाजार समिती राजकारणातील दोन्ही गटांनी शेतकऱ्यांचाच विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी लासलगाव बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर जगताप, उपसभापती ललित दरेकर, संचालक जयदत्त होळकर, बाळासाहेब क्षीरसागर, पंढरीनाथ थोरे, सुवर्णा जगताप, सोनिया होळकर, डॉ. श्रीकांत आवारे, तानाजी आंधळे, छब्बूराव जाधव, गणेश डोमाडे, रमेश पालवे, महेश पठारे, भीमराज काळे, बाळासाहेब दराडे यासह संचालक मंडळ उपस्थित होते.

Agricultural Income Market Committee Lasalgaon, Distt. Nashik
Murder Mystery | हॉटेल मिरचीजवळील अपघात ठरला हत्याकांड; नाशिक पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा

दोन्ही गटांकडून 'आशीर्वादा'चा दावा

विशेष म्हणजे, दोन्ही गटांनी आपापल्या बाजूने भुजबळांचा 'आशीर्वाद' असल्याचा दावा करण्याची राजकीय कसरत सुरू केली. एका गटाकडून 'साहेब, आम्ही तुमच्याबरोबर आहोत' असा व्हिडिओ पाठविला, पण निवडणुकीची वेळ आली की, चित्र वेगळेच. एक गट न्यायालयात, दुसरा पणन मंत्र्यांकडे. राजकारणात यालाच कदाचित आपले ते आपले आणि वेळ आली की, आपापले, असे म्हणावे लागेल, असे म्हणत भुजबळांनी या प्रकाराला 'मोठी गंमत' म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news