Gangapur Dam Discharge Continues | पूरस्थिती नियंत्रणात : गंगापूर धरणातून विसर्ग सुरूच

जिल्ह्यात पाऊस ओसरला
गंगापूर धरण , नाशिक / Gangapur Dam, Nashik
गंगापूर धरण , नाशिक / Gangapur Dam, Nashik(छाया : हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यात दोन दिवसांत पावसाने हाहाकार उडवला होता. मात्र, शुक्रवारी (दि. २४) पावसाचा जोर ओसरल्याचे चित्र आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत जिल्ह्यातील प्रमुख ठिकाणी पाऊस लक्षणीय प्रमाणात कमी झाला आहे. दरम्यान, गंगापूर धरणातून गोदावरीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

गंगापूर धरण , नाशिक / Gangapur Dam, Nashik
Prostitution Racket Busted | फ्लॅटमधून देहव्यापार, तीन महिलांची सुटका

जिल्ह्यातील गंगापूर परिसरात १२ मिमी पावसाची नोंद झाली. तर गंगापूर धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या त्र्यंबक परिसरात २३ व अंबोली परिसरात सुमारे ५५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे परिसरातील नाले, ओढे, नदी यातील पाणीपातळी हळूहळू कमी होत असून, त्याची पूर नियंत्रणाला मदत होण्याची शक्यता व्यक्त होतं.

आहे. त्यामुळे नाशिक शहरासह गोदाकाठ परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले की, पावसाचा जोर ओसरला असला तरी सतर्कता कायम ठेवली आहे. बंद रस्ते, वीजपुरवठा आणि पूरप्रवण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेवर विशेष लक्ष दिले जात आहे.

गंगापूर धरण , नाशिक / Gangapur Dam, Nashik
Nashik Municipal Corporation |महापालिकेकडून ३० अंतिम ले-आउट रद्द

हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसात चढ-उतार राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीकाठी जाणे टाळावे आणि अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले.

त्र्यंबकेश्वरला सर्वाधिक पाऊस

गुरुवारी जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस त्र्यंबकेश्वर १९३.३ व सुरगाणा येथे १६४.५ मिमीची नोंद झाली होती. तर मालेगाव-१३.२, बागलाण-४३.१, कळवण ५०.७, नाशिक -७३.४, दिंडोरी-५३.७, इगतपुरी-५६.८, पेठ -६६.५, निफाड - ३९.९, सिन्नर - २५.१, चांदवड-२८.३ अशी सर्व दूर पावसाची नोंद झाली आहे.

नाशिकच्या घाटमाथ्यावर आज 'यलो अलर्ट'

भारतीय हवामान विभागाने शनिवारी (दि. २५) घाटमाथ्याच्या भागासाठी 'यलो अलर्ट' जारी केला आहे. त्यामुळे इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा तसेच पश्चिमेकडील डोंगराळ भागांत मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात डोंगरकडा भागात दरड कोसळण्याचा धोका असल्याने सावधगिरी बाळगण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news