Prostitution Racket Busted | फ्लॅटमधून देहव्यापार, तीन महिलांची सुटका

Nashik Prostitution Racket Busted | गुन्हे शाखेने केली एजंटला अटक
Prostitution
Prostitution
Published on
Updated on

नाशिक : निवासी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये छुप्या पद्धतीने हायप्रोफाइल देहव्यापाराचा मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला. या कारवाईत एजंटला अटक केली असून, तीन महिलांची सुटका केली. जितेंद्र गणेश शेलार (३६, रा. विहितगाव) असे अटक केलेल्या मुख्य एजंटचे नाव आहे.

शहरातील वाढत्या अवैध धंद्यांवर आणि मानवी तस्करीवर आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सर्व संबंधित विभागांना कारवाईचे स्पष्ट आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखेची पथके माहिती गोळा करत होती. गुन्हे शाखेचे अंमलदार अतुल पाटील यांना विपला फाउंडेशनच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी माहिती दिली. त्यात उपनगर परिसरातील इमारतीत फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

Prostitution
Houses Damaged Nashik : जिल्ह्यात 73 घरांची पडझड, 862 नागरिक स्थलांतरित

या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून प्रकरणाची खात्री केली. सापळा रचत सहायक आयुक्त संदीप मिटके व वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. अंचल मुद्गल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि. २३) शासकीय पंच आणि पथकासह फ्लॅटवर छापा टाकला.

महिलांना दाखविली प्रलोभने प्राथमिक तपासात जितेंद्र शेलार हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी व आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना प्रलोभन दाखवून किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध या अनैतिक देहव्यापारात ढकलत असल्याचे समोर आले.

याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपास केला जात आहे.

Prostitution
Nashik Municipal Corporation |महापालिकेकडून ३० अंतिम ले-आउट रद्द

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news