Hyena Cubs Found
Hyena Cubs Found

Nashik Forest Department | सिन्नरच्या फुलेनगर शिवारात तरसाची पाच नवजात पिले आढळली

Nashik Forest Department | तालुक्यातील फुलेनगर शिवारात ज्वारीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना तरसाची नवजात पाच पिले आढळली.
Published on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील फुलेनगर शिवारात ज्वारीच्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना तरसाची नवजात पाच पिले आढळली. शेतामध्ये ज्वारी काढण्याचे काम करणाऱ्या मजुरांना चारा म्हणून साठविलेल्या मकाच्या खाली ही नवजात पिले असलेली दिसली.

Hyena Cubs Found
एमआयएमही उतरणार जि. प. निवडणुकीच्या मैदानात

आरंभी ही कुत्र्याची पिले असावीत असे त्या मजुरांना वाटले. मात्र त्यांच्या अंगावर असलेले पट्टे पाहून त्यांची ओळख पटली. दरम्यान, भीतीने गाळण उडालेले मजूर येथून पळाले. मजुरांच्या हालचाली दूरवरून मादी तरस टिपत होती.

मजूर तेथून बाजूला झाल्यानंतर मादीने एक-एक पिलू तोंडात धरून जवळ असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बाजूला हलविले. तरस हा प्राणी निर्जन भागात असतो. विशेषतः बिबट्यांचा वावर असलेल्या भागात तरस एकट्याने किंवा कळपाने आढळून येतात.

Hyena Cubs Found
Z.P Election | नाशिकसह 20 जिल्हा परिषदांचे निवडणूक निकाल आरक्षणाच्या पेचात; इच्छुकांची धाकधूक वाढली

ते इतर प्राण्यांनी शिकार केलेले मृत प्राणी खाऊन आपली गुजराण करतात. मजूर शेतात कामात व्यग्र झाल्यानंतर मादीने एक-एक करीत पिलांना तोंडात पकडून सुरक्षितस्थळी हलविल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी

पारेकर फुलेनगर परिसरात बिबट्यांचे वास्तव्य अनेकदा आढळले आहे. विवट्याच्या बरोबरीनेच तरसांचेदेखील नेहमीच दर्शन होत असते. तथापि, शेतकरी अथवा मजुरांना असे वन्यजीव आढळल्यानंतर त्यांच्यापासून सावधगिरी बाळगावी. कारण मादी आक्रमक झाल्यास एखाद्या व्यक्तीला मोठी इजा करू शकते, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी हर्षल पारेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news