नाशिकमधून पहिली ‘आस्था रेल्वे’ अयोध्येला रवाना

नाशिक : अयोध्य यात्रेसाठी रवाना होणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देताना आमदार राहुल ढिकले. 
नाशिक : अयोध्य यात्रेसाठी रवाना होणाऱ्या भाविकांना शुभेच्छा देताना आमदार राहुल ढिकले. 
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रामलल्लाच्या दर्शनासाठी भाजपतर्फे नाशिकमधून पहिली आस्था रेल्वे मंगळवारी (दि. १३) पहाटे २.४० वाजता अयोध्येच्या दिशेने रवाना झाली. नाशिक लोकसभा मतदारसंघातील १,३४४ भाविक या रेल्वेतून अयोध्येला गेले असून, बुधवारी, दि. १४ फेब्रुवारी दुपारी या भाविकांना अयोध्येत दर्शनाचा लाभ मिळणार आहे. ('Ayodhya Astha' special train)

अयोध्येत साकारलेल्या श्रीराम मंदिरात दर्शनासाठी जाण्याची इच्छा असलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील रामभक्तांसाठी भाजपने 'अयोध्या आस्था' विशेष ट्रेन ('Ayodhya Astha' special train) आयोजित केली होती. मंगळवारी पहाटे २.४० वाजता भाजप आमदार राहुल ढिकले, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, महेश हिरे, नाना शिलेदार, सुनील केदार, पवन भगूरकर यांनी आस्था रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. १,३४४ भाविकांना घेऊन अपूर्व जल्लोषात ही रेल्वे नाशिकरोड रेल्वेस्थानकातून रवाना झाली. यावेळी 'जय श्रीराम', 'वंदे मातरम', 'जय सियाराम', 'भारतमाता की जय'च्या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते. नाशिकच्या भाविकांना अयोध्या दर्शन सुलभ होण्यासाठी लक्ष्मण सावजी, किशोर काळकर, संजय पांडे अयोध्येत तळ ठोकून आहेत. नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांकडून अयोध्या दर्शनाचे नियोजन करण्यात आले आहे.

नाशिकमधून रवाना झालेल्या आस्था रेल्वेकरिता उत्तमराव उगले यांची रेल्वेप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर रेल्वेच्या प्रत्येक बोगीकरिता एक याप्रमाणे २० बोगीप्रमुखही नेमण्यात आले होते. मंगळवारी दिवसभर प्रवास करून रात्री ही रेल्वे अयोध्येत पोहोचली. अयोध्येत पोहोचलेल्या भाविकांसाठी निवास व जेवणाची सोय करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी नाशिकच्या भाविकांना रामलल्लाचे द‌र्शन घडविले जाणार आहे. ('Ayodhya Astha' special train)

नाशिक लोकसभा मतदारसंघातील भाविकांनंतर दिंडोरी मतदारसंघातील भाविकांकरिता २२ फेब्रुवारी रोजी अयोध्या येथे आस्था रेल्वे रवाना केली जाणार आहे. – प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप, नाशिक.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news