Nashik | वडिलांसह मुलाचा पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहात बुडून मृत्यू

वडिलांसह मुलाचा पहिने बारी ते वाडीवऱ्हे रस्त्यालगतच्या डोहात बुडून मृत्यू, पिता-पुत्र सिडकोतील रहिवासी
संजय  सोनवणे श्री सोनवणे
संजय सोनवणे श्री सोनवणेPudhari
Published on: 
Updated on: 

सिडको : पाण्यात पोहत असलेल्या वडिलांना पाहून मुलालाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. मात्र, काही वेळातच तो पाण्याच्या प्रवाहात अडकून बुडू लागला. मुलगा बुडत असल्याचे लक्षात येताच वडिलांनी त्याला वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र, डोहातील पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडिलांचाही बुडून मृत्यू झाला.

या घटनेत मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता. त्याचा मृतदेह दुसऱ्या दिवशी शनिवारी दुपारी साडेबारा वाजता मिळून आला. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

संजय  सोनवणे श्री सोनवणे
Nashik FDA | 'एफडीए'मध्येच मोठी भेसळ! नाशिकच्या 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस

संजय धोंडू सोनवणे (वय ५८, रा. अक्षय चौक, सिडको) असे मृत वडिलांचे नाव आहे. त्यांचा १४ वर्षीय मुलगा श्री सोनवणे याचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २४) सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

संजय  सोनवणे श्री सोनवणे
Nashik Ganpati Visarjan 2026: नाशिक पोलिसांचा दणका, अतिरिक्त ढोल पथकांना मिरवणुकीतून बाहेर काढलं; एक मंडळ- एक ढोलपथकाचा नियम

घटनेची माहिती मिळताच वाडीवऱ्हे पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. शुक्रवार रात्री साडेसातच्या सुमारास संजय सोनवणे यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. तर श्री सोनवणेचा मृतदेह शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सापडला. या प्रकरणी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस हवालदार बोराडे आणि पोलिस हवालदार तुपलोंढे करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news