Bhondhu Arun Patil Nashik | दैवीशक्ती व पैशांच्या पावासाचे आमिष दाखवणारा भोंदू अरुण पाटील अद्यापही फरार

Bhondhu Arun Patil Nashik | अनिस पदाधिकाऱ्यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट
Udgir black magic case
Udgir black magic casepudhari photo
Published on: 
Updated on: 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दैवीशक्ती आणि अघोरी पूजाविधीच्या नावाखाली पैशांचा पाऊस पाडून रातोरात श्रीमंत करण्याचे आमिष दाखवणारा भोंदू अरुण धोंडू पाटील अद्यापही फरार आहे. त्याला तात्काळ बेड्या ठोकाव्यात, अशी मागणी अनिस पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे केली.

Udgir black magic case
ED Raids IVF Centers | नाशिक, ठाणे आणि बारामतीमधील आयव्हीएफ केंद्रांवर ईडीची धडक कारवाई

सोमवारी (दि. १९) गंगापूर पोलिस ठाण्यात भोंदू पाटील याच्याविरोधात जादुटोनाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. पनवेल येथील आजाराने ग्रस्त महिलेची दैवीशक्तीने आजार बरा करण्याच्या आमिषाने आर्थिक फसवणूक केल्याचा पाटील याच्यावर आरोप आहे.

दरम्यान, अनिस पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेत यास अटक करण्याची मागणी केली. पाटील याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत असल्याने त्याच्यावर आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

अरुण पाटीलचे साथीदार रडारवर

भोंदू पाटील याचे साथीदार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्यात एका मोठ्या राजकीय पक्षाच्या आध्यात्मिक आघाडीचा पदाधिकारी पोलिसांच्या रडारवर आहे. पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तो अरुण पाटीलचा साथीदार असल्याची माहिती पुढे येत आहे. पोलिस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

भोंदूचा व्हिडिओ, पोलिसांना आव्हान

फरार भोंदू अरुण पाटील याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करत, माझ्यावर गुन्हा खोटा दाखल झाल्याचा दावा केला आहे. या व्हिडिओत पाटील याने, मी भोंदू नसून जमीन खरेदी-विक्री करणारा व्यावसायिक असल्याचा दावा केला आहे. मात्र, त्याचा हा व्हिडिओ म्हणजे पोलिसांना आव्हान असल्याची चर्चा रंगत आहे.

Udgir black magic case
Godavari River Pollution | गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचे नाशिक मनपा आयुक्तांना कडक निर्देश

मंचरच्या दाम्पत्याची फसवणूक

भोंदू पाटील याने मंचरच्या दाम्पत्याला पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून ४० लाख रुपयांना फसवल्याचे पुढे येत आहे. संबंधित महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पाटील याने काही रक्कम परत केल्याची माहिती आहे. मात्र, उर्वरित रक्कम परत करण्यास तो टाळाटाळ करत असल्याचा आरोप तक्रारदार महिलेचा आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news