Eknath Shinde News | "गट-तटाचे राजकारण चालणार नाही"; नगरसेवकांच्या बैठकीत एकनाथ शिंदेंचा सज्जड दम

Eknath Shinde News | एकनाथ शिंदेंच्या शिवसेना नगरसेवकांना कानपिचक्या
Eknath Shinde
Eknath ShindePudhari News network
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शिवसेना हा विकासाचा पक्ष आहे. नागरिकांच्या कामासाठी सर्वांनी एकजूट होऊन कार्य करावे. गट-तटाचे राजकारण कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही, असे नमूद करत आपसातील मतभेद व गटबाजीला पूर्णविराम देण्याचा स्पष्ट संदेश शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या नाशिकच्या नगरसेवकांच्या बैठकीत देण्यात आला.

Eknath Shinde
CREDAI Nashik Metro CSR | क्रेडाई वनीकरण मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यास प्रारंभ

ठाणे, कल्याण-डोंबिवलीच्या धर्तीवर नाशिकमध्येही उपमहापौरपद सव्वा वर्ष, तर गटनेते पद एक वर्षासाठीच देण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली असून, यावर अंतिम निर्णय एकनाथ शिंदे घेतील, अशी माहिती पक्षाचे संपर्क नेते राम रेपाळे यांनी दिली. उपमहापौरपदावरून शिवसेनेत घडलेल्या नाराजीनाट्यानंतर गट-तट समोर आले आहेत.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि.१०) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी नाशिकमधील शिवसेना नगरसेवकांना बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरा झालेल्या या बैठकीत नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

आगामी सिंहस्थ कुंभमेळा तसेच शहर विकासाच्या दृष्टीने खोळंबलेली कामे, नागरिकांना दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. शिंदे यांनी प्रत्येक नगरसेवकाशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधत त्यांच्या प्रभागातील प्रत्यक्ष स्थिती जाणून घेतली.

पाणीपुरवठा, रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था, आरोग्य सुविधा, शहरी पायाभूत सेवा, प्रलंबित विकासकामे, निधीची आवश्यकता तसेच स्थानिक प्रशासनिक अडचणी यावर सखोल चर्चा झाली. नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला. यावेळी पदांच्या वाटपासंदर्भात चर्चा झाली. ज्यांचे काम चांगले, परिणामकारक आणि जनतेला दिलासा देणारे असेल त्यांनाच पक्षात पुढील काळात अधिक संधी आणि जबाबदाऱ्या दिल्या जातील.

Eknath Shinde
Marathi Language Row | मराठीला गावठी भाषा म्हणणाऱ्या परप्रांतीयाला चोप

कामाच्या आधारेच मूल्यमापन होईल, असा अप्रत्यक्ष इशारा देत त्यांनी सर्वांना प्रामाणिकपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यानंतर पक्षाचे संपर्कप्रमुख राम रेपाळे यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. या बैठकीस आमदार सुहास कांदे, शिवसेना उपनेते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, मा. खा. हेमंत गोडसे, संपर्कप्रमुख राजू लवटे, उपमहापौर विलास शिंदे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते.

कल्याण, ठाणे महापालिकेत सव्वा वर्षासाठी उपमहापौरपद, तर वर्षभरासाठी गटनेते पदाचा फॉर्म्युला आहे. नाशिक संदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील.

- राम रेपाळे, संपर्कनेते, शिवसेना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news