Nashik Ashok Kharat ED Raid 2026 | महिलेचा विनयभंग; पतीवर जीवघेणा हल्ला

Nashik Ashok Kharat ED Raid 2026 | शहरातील तळवाडी परिसरात महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली.
Ashok Kharat case
Ashok Kharat casefile photo
Published on
Updated on

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा

शहरातील तळवाडी परिसरात महिलेचा विनयभंग करत तिच्या पतीवर लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुरुवारी (दि. २२) दुपारी घडली. या प्रकरणी सोनू शेळके व सिद्धेश शेळके (रा. तळवाडी, सिन्नर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Ashok Kharat case
Nashik cattle transport: चांदवड पोलिसांची धाडसी कारवाई; चार गोवंशांची सुटका

पंचवीस वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या घरी असताना सोनू शेळके हा घरात आला. त्याने फिर्यादी महिलेस मिठी मारत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने प्रतिकार करीत घरातील लोखंडी रॉडने त्याला मारहाण केली. त्यानंतर तो तेथून निघून गेला. हा प्रकार महिलेने पतीला सांगितल्यानंतर काही वेळाने सोनू शेळके पुन्हा घरात आला.

Ashok Kharat case
Nashik Nafed Onion Purchase | शासकीय त्रिसदस्यीय समितीच्या नियंत्रणात बाजार समितीत नाफेडकडून कांदा खरेदी

त्याने महिलेला शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. महिलेला वाचवण्यासाठी पती मध्यस्थी करण्यासाठी आले असता, आरोपीने त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला. त्यानंतर सिद्धेश शेळकेनेही लोखंडी कड्याने मारहाण केली. या मारहाणीत पीडितेचा पती गंभीर जखमी होत बेशुद्ध पडले. त्यांच्यावर प्रथम ग्रामीण रुग्णालयात व नंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news