Ashok Kharat Case | खरातच्या 'तृप्ताबाला'वर ईडी-आयकरचा छापा

Ashok Kharat Case | या कारवाईमुळे खरात याच्या आर्थिक व्यवहारांवर केंद्रीय यंत्रणांनी थेट लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ashok Kharat Case
Ashok Kharat Case
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भोंदू अशोक खरात याच्या गोविंदनगर येथील 'तृप्ताबाला' बंगल्यासह पुणे, शिर्डी येथील मालमत्तांवर सोमवारी (दि.१३) सक्त अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि आयकर विभागाच्या संयुक्त पथकाने छापा टाकत तब्बल १० ते १२ तास सखोल तपासणी केली. या कारवाईमुळे खरात याच्या आर्थिक व्यवहारांवर केंद्रीय यंत्रणांनी थेट लक्ष केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले आहे.

Ashok Kharat Case
Asha Bhosle | कैलास मठाप्रति आशाताईंची अपार श्रद्धा

मुंबईहून दोन खासगी वाहनांद्वारे आलेल्या सुमारे आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने सकाळी ६ च्या सुमारास बंगल्यावर धडक दिली, सुरक्षारक्षक नसल्याने घरातील सदस्यांशी संपर्क साधून दरवाजा उघडण्यात आला आणि लगेच तपासणी सुरू करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी घरातील कागदपत्रे, डिजिटल पुरावे तसेच विविध मालमत्तांशी संबंधित नोंदींची बारकाईने छाननी केली. या छाप्यात गोविंदनगर येथील राहते घर, गौळाणे परिसरातील प्लॉट तसेच ओकस प्रॉपर्टी संदर्भातील कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.

Ashok Kharat Case
Asha Bhosle | स्वरांची ऊब अन् साधेपणाचा स्पर्श

खरात यांच्या नावावर किंवा संबंधितांच्या नावावर असलेल्या मालमत्तांचा तपशील, गुंतवणूक, उत्पन्नाचे स्रोत यांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोने-चांदी किंवा इतर मौल्यवान वस्तू आहेत का, तसेच घोषित उत्पन्नाशी त्यांचा मेळ बसतो का, याचीही कसून चौकशी करण्यात आली. सकाळपासून सुरू झालेली तपासणी सायंकाळपर्यंत सुरू होती. दुपारी ३.३० च्या सुमारास अधिकाऱ्यांनी बाहेरून जेवण मागवून घेतले. मात्र, त्यानंतरही कारवाई अविरतपणे सुरूच होती. संपूर्ण कारवाई अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती.

खरातच्या व्यवहारांचा सखोल तपास

याच प्रकरणात खरातशी संबंधित नाशिकसह विविध ठिकाणांवरील एकूण ११ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता केंद्रीय तपास यंत्रणा सक्रिय झाल्याने खरात यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात त्यांच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास होऊन चौकशीचा फास आणखी आवळण्याची चिन्हे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news