Nashik Doctor | नाशिकमध्ये मद्यधुंद सरकारी डॉक्टरचा तांडव! भरधाव कारने 3 जणांना उडवले

Nashik Doctor | हिट अँड रन : दुचाकी, रिक्षाला धडक; तीन पादचारी जखमी
Nashik Doctor |
Nashik Doctor | Pudhari
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरील हमरस्त्यावर भरधाव कारने दुचाकी आणि रिक्षाला धडक दिल्याने तीन पादचारी जखमी झाल्याची घटना गुरुवारी (दि. १०) दुपारी ३ च्या सुमारास घडली. कारचालक हा जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी असल्याचे त्याच्या ओळखपत्रावरून समोर आले.

Nashik Doctor |
Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेच्या वीज बचतीचा लागणार हिशोब; 'महाऊर्जा'कडून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, नागरिकांनी त्याला पकडून सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दिनेश सीताराम पवार हा वॅगनआर कारने (एमएच १५, जेएम ४५२५) मेहेर सिग्नल चौकाकडून जात होता.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर कारचे नियंत्रण सुटल्यामुळे कारने समोरील दुचाकी तसेच रिक्षाला (एमएच १५, जेए ८२९७) धडक दिली. या घटनेत तीन पादचारी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारच्या धडकेमुळे दुचाकी आणि रिक्षाचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. नागरिकांनी कारचालकाला कारमधून बाहेर काढून पोलिसांना माहिती दिली. त्याच्याकडील ओळखपत्राची पाहणी केल्यानंतर तो शासकीय वैद्यकीय अधिकारी असल्याचे समोर आले.
दरम्यान, चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून, त्यानंतरच मद्यप्राशनाबाबत अधिकृत स्थिती स्पष्ट होणार आहे.

Nashik Doctor |
NDCC Bank | नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माजी संचालकांची पुन्हा फेरचौकशी; सहकार विभागाचे मोठे आदेश

विभागीय कारवाईकडे लक्ष

डॉ. पवार हा जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्यामुळे या घटनेची माहिती आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. पोलिस तपासातील निष्कर्ष आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई होणार असून, शासकीय सेवक म्हणून विभागीय पातळीवरही कारवाई होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news