Nashik two brothers death- 'घटसर्प'ने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

आरोग्य यंत्रणा सतर्क, संपर्कातील नागरिकांचे लसीकरण सुरू
Death Case
Death Case Pudhari
Published on
Updated on

मालेगाव : शहरातील चाळीसगाव फाटा परिसरात राहणाऱ्या मदारी कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू हा घटसर्प (डिफ्थेरिया) आजाराच्या लक्षणांनी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

Death Case
Nashik Officer transfer inquiry - जिल्हा समुदाय अधिकारी बदली प्रक्रियेची चौकशी

चाळीसगाव फाटा परिसरात झोपडीत वास्तव्यास असलेले सुनील मदारी हे मूळचे राजस्थानातील अजमेर येथील असून, गावोगावी खेळ दाखवून उदरनिर्वाह करतात. वर्षभर भटकंतीमुळे कुटुंबातील बालकांचे नियमित लसीकरण झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुनील मदारी यांचा एकवर्षीय मुलगा सावंत सुनील मदारी याला मंगळवार (दि. १२) पासून ताप व खोकल्याचा त्रास सुरू झाला होता.

खासगी रुग्णालयात उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नसल्यामुळे गुरुवारी (दि. १४) त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काबील सुनील मदारी (५) यालाही घटसर्पाची लक्षणे जाणवू लागली. नातेवाईक अमीन शहा शफीक शहा यांनी त्याला सामान्य रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना बालरोगतज्ज्ञ डॉ. ओम जाधव यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. काबीलचे शवविच्छेदन सामान्य रुग्णालयात करण्यात आले असून, संबंधित नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासणीत दोन्ही मुलांमध्ये घटसर्पाचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. उपचारादरम्यान काबीलच्या नाकातून व तोंडातून रक्तस्राव होत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांनी दिली.

Death Case
Fake Umrah visa fraud-'उमराह खिदमत'च्या नावाखाली बनावट व्हिसा देत तरुणांची फसवणूक

घटनेची माहिती मिळताच वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र डोलारे यांनी तातडीने वैद्यकीय पथक चाळीसगाव फाटा येथे पाठविले. सुनील मदारी, त्यांच्या पत्नी इतर मुलांसह संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी, लसीकरण व प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सामान्य रुग्णालय प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, घटसर्पाची लस न घेतलेल्या बालकांचे लसीकरण तातडीने नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घ्यावे.

- डॉ. जितेंद्र डोलारे, वैद्यकीय अधीक्षक, सामान्य रुग्णालय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news