Nashik Officer transfer inquiry - जिल्हा समुदाय अधिकारी बदली प्रक्रियेची चौकशी

उमेदवारांकडून तक्रारी : आरोग्य विभागाकडून दखल
transfer
transferpudhari file photo
Published on
Updated on

नाशिक : जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत ९० उपकेंद्रे रिक्त असताना केवळ ६६ उपकेंद्रे दाखवून बदली प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे ही प्रक्रिया वादात सापडली. वादात सापडलेल्या या प्रक्रियेची गंभीर दखल घेत राज्य आरोग्य विभागाने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

transfer
Fake Umrah visa fraud-'उमराह खिदमत'च्या नावाखाली बनावट व्हिसा देत तरुणांची फसवणूक

जिल्हा समुदायिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात जिल्हा अतंर्गत बदली प्रक्रिया राबविण्यात आली. ही प्रक्रिया शनिवारी (दि. १६) सुरू केली असताच एका उमेदवाराने रिक्त जागांबाबत आक्षेप नोंदविला. ९० उपकेंद्रे रिक्त असताना केवळ ६६ उपकेंद्रे दाखविली जात असल्याच्या आक्षेपावर, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे यांनी तत्काळ सामान्य प्रशासन विभागास पडताळणी करावे, असे निर्देश दिले. या पडताळणीत जागांबाबत ताळमेळ लागला नसल्याचे कळते.

शिवाय स्वाक्षरीविना आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पडताळणी अधिकाऱ्यांनी जागांबाबत स्पष्टता होत नसल्याचे सांगितले. त्यानंतर संगमनेरे यांनी तत्काळ या प्रक्रियेला स्थगिती दिली. रिक्त उपकेंद्रांची अचूक माहिती शासनाला वेळेत पाठविणे ही मूलभूत प्रशासकीय जबाबदारी असताना, ती पार पाडण्यात झालेल्या निष्काळजीपणाची थेट तक्रार राज्याच्या आरोग्य विभागाकडेदेखील झाली. याबाबत काही उमेदवारांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडेदेखील लेखी तक्रारी करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या तक्रारींची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. तसेच या प्रक्रियेची चौकशी करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण रिक्त जागांचा असलेला घोळ हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

transfer
Nashik Household budget increase-१५ दिवसांतच महिन्याच्या बजेटमध्ये दीड हजारांची वाढ

आरोग्यमंत्र्यांनी तक्रारींची गंभीर दखल घेतली आहे. त्याबाबत सर्व चौकशी केली जाईल. चौकशीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे.

- राजेंद्र भालेराव, सहसंचालक, अतांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई

आर्थिक देवाण-घेवाण ?

जिल्हा समुदाय अधिकारी यांच्या बदली प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांना सोयीची बदली करून घेण्यासाठी आर्थिक देवाण घेवाण झाल्याची चर्चा समुदाय अधिकारी वर्गात आहे. यात एका तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली असल्याचेही बोलले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news